Home Breaking News गिट्टी माफिया निलेश चौरसिया यांना तात्काळ अटक करा-आमदार रवी राणा यांची मागणी

गिट्टी माफिया निलेश चौरसिया यांना तात्काळ अटक करा-आमदार रवी राणा यांची मागणी

308

 

उषा पानसरे  कार्यकारी संपादीका मो.9921400542

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या जिलेटीन कांड्या प्रतिबंधीत असतांना निलेश चौरसिया हा आपल्या खदान मध्ये अवैधरित्या वापर करून ब्लास्टिंग करत असून जवळपास 10 करोड रुपयांच्या गिट्टीचा विनापरवाना स्टॉक करून या खदान मालकाने शासनाच्या नियमांचे उल्लंघन केले आहे
आज आमदार रवी राणा यांनी निवासी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार,ठाणेदार,मंडळ अधिकारी,तलाठी यांना सोबत घेऊन मासोद परिसरातील निलेश चौरसिया यांच्या गिट्टी खदान वर आज धाड टाकली असता,या प्रतिबंधीत जिलेटीन चा मोठा साठा व सदर जिलेटीन फोडण्यासाठी लागणारी मशीन जिला वापरण्याची परवानगी नाही असे अवैध साहित्य आढळून आले,सुर्यास्तानंतर ब्लास्टिंग ची परवानगी नसतांना ही निलेश चौरसिया हे रात्री 2 वाजता 30 फूट गड्डा करून आणि नाममात्र बारुद वापरून मोठ्या प्रमाणात जिलेटीन चा वापर करून बंदी असलेल्या मशीन द्वारे ब्लास्टिंग करतो ज्यामुळे परिसरातील घरांना तडे पडले असुन नागरिकांच्या कानठळ्या बसत आहेत ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे,जास्त ब्लास्टिंग केल्यामुळे परिसरातील बोअर,विहिरीचे पाणी या ठिकाणी जमा होत असून गावातील पाणी पातळी अत्यंत कमी होत आहे.
*सर्व बाबींचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार रवी राणा यांनी याची तक्रार जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त यांचेकडे केली असून जिप सदस्य,पस सदस्य,आणि सरपंच यांच्याही तक्रारी असल्याचे आमदार रवी राणा यांनी यावेळी सांगितले,बॉम्ब शोधक पथकाने या जिलेटीन काड्यांची तपासणी करून तात्काळ निलेश चौरसिया यांचेवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी आमदार रवी राणा यांनी यावेळी केली*