जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी बहुल ‘चारबन’ या गावातून एक अत्यंत दुर्मिळ आणि थक्क करणारी घटना समोर आली आहे.
गावातील रहिवासी पंशिराम सस्त्या यांची २७ वर्षीय पत्नी रियानी यांनी कोणत्याही वैद्यकीय सुविधेविना अत्यंत कठीण परिस्थितीत घरीच प्रसूतीदरम्यान तीन मुले आणि एका मुलीला जन्म दिला. SuryaMarathiNews
प्रसूतीनंतर माता आणि चारही नवजात बालकांना तातडीने जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
डॉक्टरांनी केलेल्या प्राथमिक तपासणीत आई रियानी आणि चारही बाळांची प्रकृती सुदैवाने स्थिर असल्याचे आढळले.
बालकांचे वजन ९०० ग्रॅम ते १ किलोदरम्यान असल्याने पुढील विशेष वैद्यकीय उपचारासाठी त्यांना तातडीने खामगाव येथील सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, लाखो किंवा करोडो प्रसूतींमागे घडणारी ही अत्यंत दुर्मिळ घटना असून, अशा प्रकरणात मुदतीपूर्व प्रसूतीमुळे बाळांचे वजन कमी असणे स्वाभाविक असते. GoodNews
सध्या खामगाव येथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली माता व बालकांवर उपचार सुरू असून संपूर्ण परिसरात या घटनेची मोठी चर्चा आहे. सूर्या मराठी न्यूज साठी अनिलसिंग चव्हाण बुलडाणा



