गोळेगाव बुद्रुक ग्रामवासियाकडून पूरग्रस्तांना अन्नधान्याच्या किट चे वाटप

 

अर्जुन कराळे शेगाव

शेगाव तालुक्या अंतर्गत असलेल्या ग्राम गोळेगाव बुद्रुक येथील ग्रामपंचायत तसेच गावकरी यांनी मानवतेसाठी सर्वधर्मसमभाव व एकतेची भावना सहानुभूती दाखवत ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सदस्य व गावकरी यांनी गावातून लोक वर्गणी करून संग्रामपूर जळगाव जामोद तालुक्यात झालेला

अतिवृष्टीमुळे अनेकांचे घरी उध्वस्त झाली त्यांचे खाण्यापिण्याचे सामान अन्नधान्य सर्व पुरामध्ये वाहून गेले अशा नागरिकांना आसलगाव येथे अन्नधान्याचे किट वाटप करून मानवतेचा एक आदर्श निर्माण केला आहे

यावेळी उपस्थित सरपंच रघुनाथ मापारी उपसरपंच पती शांताराम गावंडे सदस्य पती निलेश गावंडे, सदस्य देवचंद्र समदुर गावातील नागरिक धम्मपाल समुद्र सचिन गावंडे अनिल समदूर ग्रामपंचायत परिचारक उमेश नांदोकार आदींनी परिश्रम घेऊन जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव या ठिकाणी पूरग्रस्त पीडितांना ने अन्नधान्याचे मदत वाटप केला

यावेळी योगायोगाने त्या ठिकाणी जिल्हाधिकारी तूमोड साहेब व जळगाव जामोद च्या तहसीलदार मॅडम उपस्थित असल्याने त्यांनी सुद्धा गोळेगाव वासियांचे कौतुक केले व त्यांच्या हस्ते सुद्धा किट वाटप करण्यात आले खरोखरच तेथील पूर पीडित नागरिकांचे अवस्था पाहून डोळ्यात पाणी आले

आणि खरोखरच अशा लोकांना मदत करणे हे जीवनातील खूप मोठे पुण्याचे काम असल्याचे त्या ठिकाणी जाणीव झाली आणि कीट वाटप झाल्यानंतर खूप मोठे समाधान मिळाल्याचे गोळेगाव बुद्रुक वासियांनी सांगितले.

यावेळी उल्हास माहोदे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती आसलगाव तसेच गावचे सरपंच, सदस्य ईश्वर वानखडे व काही गावकऱ्यांनी यावेळी हीट वाटप करताना मुलाचे सहकार्य केले

Leave a Comment