रोही प्राण्यांकडून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान अंबाशी, काटोडा, खैरव, गांगलगाव येथील शेतकरी त्रस्त

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

: चिखली तालुक्यातील अंबाशीसह परिसरातील खैरव, काटोडा, गांगलगाव इत्यादी गावांमध्ये रोही, हरीण, माकडे आदी वन्य प्राण्यांनी अक्षरशा: धुमाकूळ घालत असून पिकांची नासाडी करीत आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असून दिवसेंदिवस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

याकडे संबंधित वरिष्ठांनी लक्ष देऊन वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. रोही, हरीण यांचा कळप एकाच वेळी शेतात घुसून पीक मोठ्या प्रमाणात उध्वस्त करतात. अगोदरच पाऊस उशिरा झाल्याने पेरण्याही उशिरा झाल्या.

त्यातच शेतमालाचे पडलेले भाव, विमा कंपनीकडून पिक विमा अनुदानाची अनियमितता, यातून कसेबसे सावरत शेतकऱ्यांनी एक महिना उशिरा पेरणी केली. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी मशागत केल्यामुळे पिके बहरत आहेत.

त्यातच जमिनीच्या बाहेर आलेली कोवळी पिके रोही, माकडांनी फस्त करणे सुरू केले आहे. त्यामुळे दिवस-रात्र पिकांची राखण करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

याबाबत वन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा व नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत

Leave a Comment