ग्राम जयंती महोत्सव आदर्श विवाह मेळावा कोळशी येथे संपन्न

 

पंधरा वर्षात 60 विवाह पार पडले

कोरपना तालुका प्रतिनिधी मनोज गोरे

कोरपणा तालुक्यातील कोळशी या गावांमध्ये ग्राम जयंती महोत्सव आदर्श विवाह मेळावा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केल्या जातात यावर्षीही या मेळाव्यामध्ये तीन विवाह पार पडले सतत पंधरा वर्षांपासून ही परंपरा अविरत कोळसी ग्रामवाशी राबवीत आहे

यामध्ये कमी खर्चामध्ये कसल्याही प्रकारची आर्थिक मदत न घेता विवाह लावल्या जातात लाखो रुपयांची उधळण आजच्या कलियुगीन परिस्थिती होत आहे हे लक्षात घेता गावागावात सुख शांती प्रस्थापित होण्याच्या दृष्टीने सर्व थोर महापुरुष व संतांच्या जयंतीचे औचित्य साधून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या अंतिम इच्छा नुसार श्री गुरुदेव सेवा मंडळ सक्रिय कार्य घडविण्यासाठी तसेच नव्या पिढीला मानवधर्मांचा विश्वशांतीचा व बंधुत्वाचा दिव्य संदेश देणाऱ्या साधुसंत व महापुरुषांच्या कार्यकर्तृत्वाची जाणीव व्हावी व प्रेरणा मिळावी

या निमित्ताने ग्राम जयंती महोत्सव आदर्श विवाह मेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेत त्यानिमित्त या कार्यक्रमात विवाह सोहळा ठेवण्यात आले यामध्ये कोळशी गावातील युवक तरुण पुढे येऊन असे विविध कार्यक्रम गावात राबविले जात आहेत

आज या विवाह सोहळ्यामध्ये परिसरातील गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व अनेक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिथी दर्शवून हा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे संचालन मारुती सातपुते यांनी केले

Leave a Comment