ग्रा.प.सरपंच पदाचे आरक्षण जाहीर …. “कही खुशी , कही गम”

 

संग्रामपूर – तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या आरक्षण जाहीर झाले आहे . यामध्ये आजी माजी सरपंचसह राजकीय पुढाकार्यांमध्ये ‘ कही खुशी कही गम ‘ असे चित्र पहावयास मिळाले आले. तालुक्यातील ५० ग्रामपंचायतीमधील २०२० ते २०२५ या कालावधीत सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत तहसील कार्यालयात आज दिनांक ७ डिसेंम्बर रोजी पार पडली . यात अनेक ठिकाणी फेरबदल झाल्याने ‘ कही खुशी कही गम ‘ असे चित्र पाहायला मिळाले .

 

सार्वत्रिक निवडणुकीद्ववारे गठीत होणा – या ग्राम पंचायातीच्या सरंपच पदाचे आरक्षण दि .०७ डिसेंबर रोजी.तसेच अनूसुचीत जाती , अनुसुचीत जमाती , नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग आरक्षण सोडत काढण्यात आले आहे . त्यामध्ये १. अनुसूचीत जाती चे सरपंच पदाचे आरक्षण – १ दुर्गादत्य २ काकोडा ३ बोडखा ४ चांगेफळ खु .५ काकणवाडा बु . ६ वरवट बकाल ७ कवठळ ८ पातुर्डी बु . २. अनुसुचीत जमाती सरपंच पदाचे आरक्षण – १ जस्तगांव २ रुधाना ३ तामगांव ४ चौढी ५ काटेल ६ वरवट खंडेराव ७ सावळी ८ पातुर्डी खु . ३. नागरिकांचा मागास प्रवर्ग -१ कोद्री २ मारोउ ३ रिंगणवाडी ४ टाकळी पंचगव्हाण ५ वानखेड ६ पिंप्री अडगांव ७ एकलारा बानोदा ८ आलेवाडी ९ सायखेड १० खिरोडा ११ मनार्डी १२ भोन १३ पळसोडा

 

तसेच उर्वरित ग्राम पंचायत सर्व साधारण प्रमाणे १.कळमखेड २ पिप्री काथरगांव ३ उकळी बु .४ निरोड ५ आकोली बु . ६ कोलद ७ आवार ८ वकाणा ९ पळशी झाशी १० वडगांव अडगांव ११ पेसोडा १२ उमरा १३ धामगांव १४ टूनकी बु .१५ सगोडा १६ सोनाळा १७ बावणबीर १८ लाडणापूर १ ९ काकणवाडा खु . २० करमोडा २१ वसाडी ह्यामधील महिला आरक्षण जिल्हाधिकारी कार्यालयात १० डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे.
आज तहसिल कार्यलयात कु.वैशाली देवकर , उपविभागीय अधिकारी , जळगांव जामोद , यांच्या अध्यक्षते खाली व मा.व्हि.एस.चव्हाण तहसिलदार संग्रामपूर तथा निवडणुक अधिकारी म्हणून सरपंच पदाचे आरक्षण सोडत यांनी पारपाडले तसेच या कामाकरिता श्री.एस.ए.दाभाडे कनिष्ठ लिपीक निवडणुक विभाग , तसेच श्री.एस.एम.शेगोकार अ.का. श्री.ए.एस.सरवदे कनिष्ठ लिपीक यांनी काम पाहिले .

Leave a Comment