चांगेफळ ते भेडवळ रस्त्याचे काम त्वरीत करा किसान सेनेचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन

संग्रामपूर तालुक्यातील चांगेफळ ते भेंडवळ रस्त्याचे काम गत चार ते पाच वर्षापासून सुरू आहे मात्र हे काम संथ गतीने व कासव गतीने सुरू असल्यामुळे या रस्त्यावर अपघात सुरूच आहेत त्यामुळे चांगेफळ ते भेंडवळ रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करा या मागणीसाठी किसान सेना तालुकाप्रमुख अमोल ठाकरे यांच्या वतीने संग्रामपूर तहसीलदारा मार्फत सार्वजनिक बांधकाम विभागाला २० ऑक्टोबर रोजी निवेदन देण्यात आले.

सदर दिलेल्या निवेदनात नमूद आहे
चांगेफळ ते भेंडवळ रस्त्याचे काम आपल्या विभागामार्फत मागील चार ते पाच वर्षापासून सुरू आहे. संथ गतीने व कासवगतीने सुरु असलेल्या या रस्त्याचे काम कित्येक वेळा या दोन वर्षात बंद पडलेले आहे व रखडलेले आहे .ह्या रखडलेल्या कामामुळे व रस्त्यावर खोदून ठेवलेल्या रस्त्यामुळे अपघात होऊन.

अनेकांचे बळी या रस्त्यावर गेलेले आहेत .आपण खोदून ठेवलेल्या रस्त्यामुळे रस्त्यावर धूळच धूळ आहे त्यामुळे वाहन चालक या रस्त्यावरून दररोज ये जा करतात त्या नागरिकांना या रस्त्यावरील धुळीमुळे श्वसनाचा त्रास सुरू झालेला आहे

तसेच रस्ता खोदून ठेवल्यामुळे रस्त्यावर गड्डे असल्यामुळे अनेकांना कंबर दुखी चे त्रास वाहन चालकांना सुरू झालेले आहेत तसेच याच खोदून ठेवलेल्या रस्त्यावरची धूळ शेतकऱ्यांच्या पिकावर पडत असल्यामुळे शेतकऱ्यांची पिके गत दोन वर्षापासून खराब होत आहेत. त्यामुळे आपण या रस्त्याचे मागील दोन वर्षांपासून बंद असलेले काम त्वरित पूर्ण करावे.

अन्यथा आम्ही शिवसेना स्टाईलने मा. नरेंद्रजी खेडेकर जिल्हा संपर्क प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व मा दत्ता पाटील मा वसंतराव भोजने यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करू याची सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील अशा आशयाचे निवेदन देण्यात आलेले आहे

या निवेदनावर किसान सेना तालुकाप्रमुख अमोल ठाकरे शुभम घाटे शहर प्रमुख, विजय मारोडे उप ता प्रमुख , राहुल मेटांगे , शेख अब्दुल, धनंजय अवचार ,नेमीवंत तेल्हारकर, सुनील मुकुंद, वैभव मानकर, गजानन वानखडे उपशहर प्रमुख ,सुमित डोसे ,गणेश डाखोडे, रीलेश ठाकरे, गौरव ठाकरे ,नितीन सुलताने, पिंटू दाभाडे ,काशिनाथ हावरे, विलास पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या या निवेदनावर आहेत

Leave a Comment