चिखली येथील महाबिज,दवाखाने,हाॅटेल समोर रबलींग स्ट्रीप टाका–स्वाभिमानीची मागणी
स्वाभिमानी संघटनेची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी
चिखली–शहरातुन जाणार्या खामगांव चौफुली ते मेहकर फाटा या महामार्गावर अनेक अपघात झाले अनेकांना जीव गमवावा लागला आहे.सतत होत असलेले अपघात पाहता स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा एकदा सरसावली असुन या महामार्गावर महत्वाच्या व वर्दळीच्या ठीकाणी रस्त्यावर रबलींग स्ट्रीप टाकण्यात यावे,शहरातुन जात असलेल्या वाहणांना गती क्षमता(स्पिड लिमिट )बांधुन देण्यात यावी,रस्ता कडेला बॅरीगेट लावण्यात यावे,अशी मागणी स्वाभिमानीचे नितिन राजपुत, विनायक सरनाईक यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे दि०३फेब्रुवारी रोजी केली आहे.
चिखली शहरातुन जाणार्या खामगांव चौफुली ते मेहकर फाटा मधोमध आपघाताच्या प्रमाणामधे वाढ झाली आहे.या रस्त्यावर या एक दिड महिण्यामधे महाबिज समोर अनेक वेळा अपघात झाले परवा सुद्धा एका हाॅटेल समोर आपघात झाला आहे.या झालेल्या अपघातांमधे अनेकांना जिव गमवावा लागला आहे.सदर रस्त्यावर भरधाव वेगाने वाहणे चालत असतात तर याच महामार्गावर हाॅटेल्स असल्याने या ठिकाणी नियमीत लग्न समारंभ होत असल्याने गर्दि होत असती.भारतीय राज्य घटनेनुसार भारतीय नागरीकांना मुलभुत सुविधा पुरवीणे हे शासनाची कायदेशीर व नैतिक जबाबदारी आहे परंतु प्रशासनाकडुन कर्तव्यात कसुर होत असल्यानेच अनेकांना जिव गमवावा लागला असल्याचा आरोप स्वाभिमानी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.या झालेल्या वेगवेगळ्या आपघातामधे कहिना आपला मुलगा,भाऊ,वडील,पती नातेवाईक गमवले आहे.तर काहिंना कायमचे अपंगत्व आले आहे.तसेच अनेक कुटुंब उघड्यावर आले आहे.यापुर्वी सुद्धा रस्त्यावर ठिकठीकाणी गतिरोधक टाकावे अशी मागणी करण्यात आली होती.परंतु दररोज होत असलेले अपघात पाहता खामगांव चौफुली ते मेहकर फाटा ठिकठिकाणी असलेल्या हॉटेल्स,पेट्रोल पंप व वर्दळीच्या ठिकाणी कलर रबल्लीग स्ट्रीप टाकण्यात यावे,शहरातुन बाहेर पडे पर्यत वाहनांना गती क्षमता बांधुन देण्यात यावी,तशा प्रकारचे फलक रबल्लींग स्ट्रीप समोर लावण्यात यावे,ज्या ठीकाणी बॅरीगेट नाहित अशा ठीकाणी तात्काळ बॅरीगेट लावावे,बॅरीगेट लावण्यात कसुर केल्याप्रकरणी संबंधीतावर मनुष्य वधाचा गुन्हे दाखल करावे व होणार्या अपघातांना आळा घालण्यासाठी योग्य उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी पालकमंत्री, जिल्हाधिकारी,तहसिलदार,
राष्ट्रीय महामार्गाचे उपविभागीय अभियंता,यांच्याकडे करण्यात आली आहे.सदर मागण्यांची दखल घेऊन कारवाई न झाल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानीचे नितिन राजपुत, विनायक सरनाईक,अनिल चौहान,राम अंभोरे, सुधाकर तायडे,रविराज टाले,यांच्यासह आदिंनी दिला आहे.