जय बजरंग कनिष्ठ कला महाविद्यालयात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा बदललं मागदर्शन

 

योगेश नागोलकार

राहेर:जय बजरंग कनिष्ठ कला महाविद्यालय आणि जय बजरंग कला महाविद्यालय चान्नी येथे आज दिनांक २४ आॕगस्ट २०२२ रोजी स्पर्धा परीक्षा बदललं मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून साई करिअर अकॅडमी, मोताळ्याचे संचालक प्रा. प्रमोद कौसकार होते . सरांनी विद्यार्थ्यांना पोलिस, सैन्य, तलाठी, पटवारी भरती बद्दल मार्गदर्शन केले , तसेच या परीक्षांच्या तयारी संबंधी मार्गदर्शन केले.
जय बजरंग कनिष्ठ कला महाविद्यालय चान्नी येथे वर्षभर मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन दिल्या जाईल. ही सोय जय बजरंग च्या कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना देण्यात येईल. सदर उपक्रम प्राचार्य संग्राम इंगळे सर व त्यांच्या सहकारी शिक्षकांच्या सहकार्यातून राबविण्यात येईल.व विद्यार्थीनींनी व विद्यार्थ्यांनी या परीक्षेचा लाभ घ्यावा.

Leave a Comment