जलालदाभा विद्युत उपकेंद्र मंजुरी मिळावी: विठ्ठलराव पोले

 

अंकुश गिरी
ग्रामीण प्रतिनिधी,सेनगाव

औंढा नागनाथ: शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री.संतोषराव बांगर हे औढा नागनाथ दौर्‍यावर गेले असता जलालदाभा विद्युत उपकेंद्र 33 केव्ही मंजुरी मिळवून देण्यात यावी असे निवेदन शिवसेना औंढानागनाथ उप तालुका प्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक श्री.विठ्ठलराव उत्तमराव पोले यांनी केले. यावेळी हिंगोली शिवसेनेचे नगरसेवक रामभाऊ कदम, गंगाधर पोले, शिवसेना तालुकाप्रमुख साहेबराव देशमुख, शहरप्रमुख अनिल देव, नगरसेवक कुरूवाडे सुदाम, किसन काशीदे, खोकले सर व अन्य गावकरी उपस्थित होते.

Leave a Comment