जळगाव काँग्रेस च्या वतीने धरणे आंदोलन

 

गजानन सोनटक्के
जळगाव जा जा

आज राष्ट्रपिता महात्मा गांधी तथा दिवंगत पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रीजी यांच्या जयंतीच्या पर्वावर.
जळगांव जा तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने, शेतकरी व कामगार बचाव दिवस म्हणून केंद्र सरकारने पारित केलेले शेतकरी विरोधी काळे कायदे मागे घेण्यासंदर्भात संपूर्ण जिल्ह्यात धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

आज महामानवांच्या प्रतिमांना अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून, विविध मुद्यांवर प्रकाश टाकणाऱ्या फलकांसह जळगांव जामोद तहसिल कार्यालय समोर तालुका व शहर काँग्रेसच्या धरणे आंदोलनाला सुरुवात झाली आहे.यावेळी जळगांव जामोद मतदार संघातील बहुसंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते….

Leave a Comment