०२ ऑक्टोबर २०२० आपले सर्वांचे लाडके बापू राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५१ वी जयंती.

 

 

मुंबई प्रतिनिधी (महेश कदम)

बेबी राठोड, किसन नगर स्कूल, ठाणे, इयत्ता:- नववी, हिने लिहिलेली महात्मा गांधी संदर्भात माहिती व भैरवी गडगे, साधना विद्यालय हिने काढलेले महात्मा गांधी चे छायाचित्र. जाणुन घेऊ त्या विषयी.

मला कळलेले गांधी….

आजवर भारतात अनेक नेते मंडळी होऊन गेली आहेत पण मला जर कोणी प्रश्न विचारला तुझे आवडते नेते कोण ? तर एका क्षणाचा विचार न करता माझं उत्तर असेल ते म्हणजे महात्मा गांधी.

गांधीजींना ‘महात्मा’, ‘राष्ट्रपिता’, आणि ‘साबरमतीचे संत’ म्हणून सुद्धा ओळखले जाते. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी त्यांनी देशाच्या नागरिकांना प्रेरणा देण्याचे खूप काम केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली देशाला स्वातंत्र्य मिळाले असे म्हंटले तरी कधीच वावगं ठरू शकत नाही.

बापूंना संपूर्ण जग ओळखते. त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते. त्यांचा जन्म गुजरात येथील पोरबंदर नगरात ०२ ऑक्टोबर, १८६९ मध्ये झाला. भारतात शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी ते इंग्लंडला गेले आणि बॅरिस्टर बनून भारतात आले. पुढे ते दक्षिण आफ्रिकेत गेले आणि तिथून समाजाची सेवा करण्यास सुरुवात केले परत भारतात आल्यावर देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा त्यांनी निर्णय घेतला. अखेर १५ ऑगस्ट, १९४७ रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. ३० जानेवारी, १९४८ रोजी गांधीजींची हत्या करण्यात आली. त्यावेळी संपूर्ण देश शोकाकुल वातावरणातून जात होता.

बापूंनी समाजाला तीन तत्वे सांगितली एक म्हणजे सत्य , दुसरे म्हणजे अहिंसा आणि तिसरे म्हणजे सत्याग्रह. महान उद्देश प्राप्त करायचे असेल तर पवित्र साधनांचा वापर करावा अशी त्यांची शिकवण आहे.

लेखाच्या शेवटी एवढंच म्हणेल कि

दे दी हमें आज़ादी बिना खड्ग बिना ढाल साबरमती के संत तूने कर दिया कमाल.

जयंती निमित्त विनम्र अभिवादन

Leave a Comment