Home बुलढाणा जळगाव जामोद तहसील कार्यालयासमोर तालुका शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करीत रावसाहेब दानवे...

जळगाव जामोद तहसील कार्यालयासमोर तालुका शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करीत रावसाहेब दानवे यांचा निषेध…

371
0

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी

शिवसेनेच्यावतीने रावसाहेब दानवे यांचा निषेध दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबद्दल बोलताना मंत्री दानवे यांनी या आंदोलनाला पाकिस्तान आणि चीनकडून मदत मिळत असल्याचे वक्तव्य केले आहे.शेतकरी स्वत:च्या हितासाठी लढत असताना त्यांना शत्रू राष्ट्रांकडून मदत मिळत असल्याचे म्हणणे म्हणजे आपल्या घाणेरड्या विचारसरणीचे प्रदर्शन आहे. दानवे यांनी यापूर्वीही शेतकऱ्यांबद्दल निंदनीय वक्तव्य केले होते. त्यावेळी त्यांचे शेतकऱ्यांबद्दल असलेले विचार लोकांना कळून चुकले होते. दानवे यांचे ते वक्तव्य शेतकरी अद्याप विसरलेले नाहीत. हेच दानवे जेव्हा आता पुन्हा शेतकऱ्यांच्या आंदोलनासंबंधी वक्तव्य करतात तेव्हा पुन्हा एकदा त्यांची तीच विचारसरणी पुढे येत आहे. यापुढे दानवे यांना आम्ही राजकीय विरोधक म्हणून काही उत्तर देण्यापेक्षा सर्वसामान्य लोकच त्यांना योग्य ते उत्तर देतील. अशा लोकांचे वक्तव्य जास्त कोणीही फारसे मनाला लावून घेऊ नये, असे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटते. मात्र ते असेच पुन्हा पुन्हा बोलत राहिले तर आम्ही सुद्धा शांत राहणार नाही.तसेच पंतप्रधान यांनी रावसाहेब दानवे यांचा राजीनामा मागावा कारण नेहमीच ते शेतकरी विरोधात वक्तव्य करत असतात.असे वक्तव्य करणाऱ्या दानवे यांचा निषेध करुन दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाविषयी ही वक्तव्य करणाऱ्या रावसाहेब दानवे चा निषेध करून रावसाहेब दानवे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख गजानन वाघ यांनी केली गेल्या बारा महिन्यापासून पेट्रोल डिझेलची वाढ होत असून सामान्य जनता त्रस्त झालेली असून त्यात होरपळून निघत आहे प्रशासनाचा निषेध करून रावसाहेब दानवे यांचा त्वरित राजीनामा घ्यावा अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.यावेळी गजानन वाघ तालुकाप्रमुख, नगरसेवक रमेश ताडे,पुंडलिक पाटील,देविदास घोपे,संजय भुजबळ, समाधान पाटील, संतोष बोरसे,राजेश पांधी, शुभम पाटील, विशाल पाटील, पुंडलिक धुळे, शिवाजी मेहसरे,चांद कुरेशी, पांडुरंग उगले, दिलीप आकोटकर, अक्षय भालतडक, ईश्वर वाघ, दीपक बावस्कार, सुनील खवले,गजानन धुळे, गणेश धुळे, मुन्ना रावनचवरे, प्रशांत ताडे, गजानन देशमुख, रमेश हागे, संकेत रहाटे, मधू धुर्डे, केशव काळपांडे,दिलीप सिंह ठाकुर, युवराज देशमुख, सुभाष माने, अनिल खरे, पंकज भगत, गुड्डू काजी, नवाब देशमुख, शेख रफीक यांच्यासह शेकडो कार्यकर्ते हे यावेळी उपस्थित होते.

Previous articleबी पी एल चा दाखला ग्रामपंचायत स्तरावर मिळणार
Next articleपातुर शहरातील विविध विकास कामासंबधी नगरपरीषद बांधकाम सभापती सौ.तुळसाबाई गाडगे यांची मागणी…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here