गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी:-
जळगाव जामोद शहरातील बायपास रोड जवळ असलेल्या पुलावरून भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीस्वारांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी सह दुचाकीस्वार शिवा दादाराव वानखडे हा नाल्याच्या पुलावरून खाली कोसळला त्यामुळे नाल्यातील पाण्यामुळे दुचाकीवरील शिवा दादाराव वानखडे याचा जागीच मृत्यू झाला हि घटना दिनांक 28 सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेसात ते आठ वाजे दरम्यान घडली दुचाकीस्वार हा जळगाव शहरातील आठवडी बाजार गौतम नगर वार्ड क्रमांक 16 येथील शिवा दादाराव वानखडे वय 26 वर्षे याला सरकारी दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या पश्चात आई-वडील एक भाऊ दोन बहिणी असा बराच मोठा आप्तपरिवार आहे या घटनेमुळे आठवडी बाजार गौतम नगर वार्ड क्रमांक 16 मध्ये हळहळ व्यक्त होताना दिसत आहे.