जवळा बुद्रुक येथे 35 वर्षीय विवाहितेची गळफास लावून आत्महत्या..

 

अर्जुन कराळे शेगाव तालुका प्रतिनिधी

शेगाव: तालुक्यातील जवळा बुद्रुक येथील 35 वर्षीय विवाहितेने स्वतःच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 13 ऑक्टोंबर रोजी उघडकीस आली याबाबत शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये मार्ग दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शेगाव ग्रामीण पोलीस सुत्रा कडून मिळालेल्या माहितीनुसार शांताराम सावदेकर वय 52 वर्ष यांनी शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की जवळा बुद्रुक येथील माझ्या चुलत भावाची पत्नी छाया शामराव सावदेकर अंदाजे 35 वर्षे राहणार जवळा बुद्रुक तालुका शेगाव यांनी स्वतःच्या राहत्या घरात आल्याला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

सदर फिर्यादीवरून शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे बीट जमदार पोलीस हेडकॉन्स्टेबल करून अरुण मेटांगे बकल नंबर 850 हे त्यांच्या सहकार्यासह घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी पंचनामा करून विच्छेदनासाठी सईबाई मोटे उपजिल्हा सामान्य रुग्णालय शेगाव येथे आणण्यात आले या प्रकरणी शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये वर्ग क्रमांक 28 ऑब्लिक 2023 कलम 174 जा.फौ.नुसार मर्ग दाखल केला आहे.

याबाबत अधिक तपास शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिलीप वडगावकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल अरुण मेटेंगे साहेब बक्कल नंबर 850 हे करीत आहेत

Leave a Comment