Home Breaking News जातेगांव येथे १४ फेब्रुवारी काळा दिवस म्हणून पाळला : पूलवामातील शहिदांना श्रध्दांजली.

जातेगांव येथे १४ फेब्रुवारी काळा दिवस म्हणून पाळला : पूलवामातील शहिदांना श्रध्दांजली.

457
0

 

 

प्रतिनिधी -सचिन पगारे
नांदगांव नाशिक

१४ फेब्रुवारी २०१९ रोजी जम्मू काश्मीर मधील पूलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजलीसाठी १४ फेब्रुवारी हा दिवस काळा दिवस म्हणून पाळण्यात आला व श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .येथील शिवाजी चौकात सदर कार्यक्रमाचे आयोजन पिनाकेश्वर माजी सैनिक संघटनेने केले तसेच याठिकाणी तमाम ग्रामस्थांच्या उपस्थितीत श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
नांदगाव तालुक्यातील जातेगांव येथे १४ फेब्रुवारी रोजी जम्मू काश्मीर मधील पूलवामा येथील जवानांवर १४ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गावातील पिनाकेश्वर माजी सैनिक संघटनेकडून सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुलाब चव्हाण यांनी केले. पिनाकेश्वर माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष संपत पगारे आणि पदाधिकारी यांनी शहिद जवानांच्या प्रतिमेला पुष्पचक्र अर्पण करुन श्रध्दांजली अर्पण केली. मनोज गर्जे, संदीप पवार,नारायण पवार ,विजय पाटील यांनी आपले मत व्यक्त करुन श्रध्दांजली अर्पण केली. याठिकाणी माजी सैनिक कृष्णा शिंदे,रामदास पवार,मनोज बागूल,विष्णू झोडगे ,विष्णू पवारआदीसह ग्रामस्थ व तरुण मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Previous articleपुलवामा हल्ल्याला दोन वर्षे पूर्ण सुनगाव येथे वाहिली शहिदांना श्रद्धांजली…
Next articleकिनगाव जवळ पपई ने भरलेला आयशर ट्रक पलटी १५ मजुरांचा जागीच मुत्यु एकाच कुटुंबातील १० जणांचा समावेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here