जिजाऊ मासाहेबांनी रयतेचे राज्य निर्माण केले सुमीत सरदार

महापुरुषांचे आदर्श घेऊन जागृती करणारे वृध्दाश्रम
डाॅ निलेश गोसावी

चिखली:- ऋणानुबंध समाज विकास संस्था चिखली व गंगाई बहुउद्देशिय सेवाभावी संस्था अमोना च्या संयुक्त विद्यमाने तुकाराम आश्रय वृध्दाश्रम भोकर येथे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जयंती निमीत्त मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्दघाटक माजी जि.प. सदस्य सुमीत सरदार, अध्यक्ष गजानन फोलाने सरपंच भोकर, प्रमुख मार्गदर्शक डाॅ निलेश गोसावी हृदय रोगतंज्ञ, डाॅ धनंजय परीहार स्त्री रोग तंज्ञ हे होते.

सत्कारमुर्ती गोपाल तुपकर व्हाईस आॅफ इंडीया टीव्ही जनरलीस्ट असोसीयेशन जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष शेख युसुफ, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश शर्मा तर प्रमुख उपस्थीतीत डाॅ सागर चिंलोले अस्थीरोग तज्ञ, डाॅ निरंजन काळे बालरोगतज्ञ, डाॅ सागर ठेंग दंतरोग तज्ञ, अनंता डोंगरदिवे उपसरपंच भोकर, संघरत्न साळवे, राजरत्न हिवाळे हे होते.

जिजाऊ मासाहेबांनी रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी शिवबांना घडवले म्हणुन आज बहुजन समाज गुणागोवींदाने राहत आहे. तसेच महापुरुषांचा आदर्श जोपासत ऋणानुबंध समाज विकास संस्था तुकाराम आश्रय वृध्दाश्रम चे कार्य करीत आहे. यावेळी हृदय रोग, स्त्रीरोग, अस्थीरोग, नेत्ररोग, दंतरोग व बालरोग ईत्यांदि आजारावर मोफत तपासणी करण्यात आली यावेळी शेकडो नागरीकांनी या शिबीराचा फायदा घेतला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रशांत डोंगरदिवे यांनी तर आभार प्रदर्शन सौ रुपाली डोंगरदिवे यांनी केले.

यावेळी रवीशंकर डोंगरदिवे, विश्वनाथ खंदारे, रमेश डोंगरदिवे, राहुल घेवंदे, लिंबा वानखडे, केशव डोंगरदिवे, जगदेव डोंगरदिवे, संकेत डोंगरदिवे, विलास डोंगरदिवे, फकीरबा डोंगरदिवे,गुनवंत फोलाने, मोहन नेवरे, सखाराम नेवरे, भास्कर डोंगरदिवे, भिमराव नेवरे, अनंता पवार यांच्यासह समस्त गावकरी मंडळी उपस्थीत होते.

Leave a Comment