गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी:
जळगाव जामोद तालुक्यातील सुनगांव येथे दिनांक 12 जानेवारी रोजी जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा येथे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम जिजाऊ मासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच स्वामी विवेकानंद सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष सुनीताताई सोनटक्के ह्या होत्या तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सारोकार सर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन बुटे सर यांनी केले राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या जयंती दिनी शाळेच्या शिक्षिका अस्मिता शिरसागर यांनी covid-19 च्या काळामध्ये ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांसाठी राबविलेल्या विविध उपक्रमांबद्दल त्यांचा राजमाता जिजाऊ जयंतीदिनी सत्कार करण्यात आला तसेच covid-19 च्या काळामध्ये अंगणवाडी सेविकांनी या काळामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल संपूर्ण अंगणवाडीसेविकांचा सत्कार करण्यात आला तसेच बचत गटातील महिलांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती शाळेचे मुख्याध्यापक श्री ताडे सर तसेच सुनगाव ग्रामपंचायतचे सचिव श्री चौधरी हे होते ग्रामपंचायतचे सचिव चौधरी यांनी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या योगदानाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले तसेच कार्यक्रमाला शाळेचे शिक्षक गवई सर,बुटे सर,सहावे सर,सारोकार सर,निकम सर,शफिक सर,शेख सर, तसेच महिला शिक्षिका अस्मिता शिरसागर, बोंबटकार मॅडम, उमाळे मॅडम, खर्डे मॅडम, राजगुरे मॅडम, शाळा समिती अध्यक्ष पती रामदास सोनटक्के, ग्रामपंचायत कर्मचारी संतोष ताडे, गजानन धुळे, मनोहर वानखडे,राजेश अंदुरकार, यांच्यासह अंगणवाडी सेविका मिना जोशी,सुनिता भड,चंदा चिंचोलकार, अनुसया वंडाळे,सखु पाटील,गिता दामधर,पुष्पा सांगळे,आम्रपाली अंदुरकार, सविता धुळे, वैशाली आकोटकार,वेणु वानखडे, आरीफाबी मालेखाँ यांच्यासह गावातीलच महिला बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.