टिपु सुलतान जयंती निमित्त 19 नोव्हेंबर रोजी भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगांव: शहिदे वतन हजरत टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त रविवार 19 नोव्हेंबर रोजी भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.स्थानिक आठवडी बाजार परिसरातील शहिद अ.हमीद चौक येथील डॉ. असलम खान यांच्या शिफा क्लिनिक येथे रविवारी सकाळी 11 ते दुपारी दोन वाजेपर्यंत चालणाऱ्या या शिबिरात प्रख्यात नेत्रतज्ञ डॉ.दाऊद देवाणी हे केवळ 50 नेत्र रुग्णांचीच मोफत नेत्र तपासणी करणार आहेत.

त्यामुळे गरजू रुग्णांनी त्वरीत रिलीफ मेडीकल अ.हमीद चौक आठवडी बाजार मो.क्र.9420834600, व देवाणी चष्मा घर ,सहारा आय क्लिनीक मेन रोड शेगांव 9604243414 येथे नाव नोंदणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे .

Leave a Comment