डॉक्टर तो भगवान का रूप होता है??? अकोल्यातील डॉक्टरने विकलांग युवती सोबत केले गैरवर्तन,डॉक्टर वर विनयभंगाचा गुन्हा दाखल

 

अकोला – कोरोनाच्या महामारीत जगभर डॉक्टर रुग्णांचे प्राण वाचवत आहेत. मात्र, वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणारी घटना अकोला शहरात घडली आहे. डॉक्टररांनपासून कोणतीही गोष्ट लपविली तर आपणच गोत्यात येतो असे बोलले जाते मात्र याच गोष्टींचा फायदा अनेक जण उचलत असतात त्यातुन विनयभंग सारखे गुन्हे घडत असतात असाच प्रत्यय आज अकोल्यात आला आहे. खामगाव जिल्ह्यातील एक छोट्याशा गावात राहणाऱ्या परिवरराती एक पीडिता आपल्या आई आणि भावा सोबत अकोल्यात आली दोन वर्षांपासून पोटात दुखत असल्याने दुर्गा चौक स्थित पुरुषोत्तम तायडे यांच्या अमृत हॉस्पिटलमध्ये तपासणी साठी आली असता सदर डॉक्टर ने तिची सोनोग्राफी करण्यासाठी तिला आपल्या कॅबिन मध्ये झोपवले पीडितेचा आईला व भावाला शंका आल्याने त्यांनी या नराधम डॉक्टर आत के करतो आहे पाहण्याच्या प्रयत्न केला असता या डॉक्टर ने पीडितेच्या आई व भावाला कॅबिन बाहेर काढले व व पीडिते सोबत गैरवर्तन केले असता पीडितेने या नराधम डॉक्टर च्या कानशिलेत पेटवली थोड्या वेळाने तपासणी होताच सदर पीडितेने कॅबिन मध्ये घडलेला संपूर्ण प्रकार आपल्या आईला सांगताच पीडितेच्या भावाने रामदास पेठ पोलीस स्टेशन गाठून गुन्ह्या नोंदविला डॉक्टरने विनयभंग केल्याचा आरोप करीत पोलीस स्टेशन गाठल्याने वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे सदर प्रकरणात डॉक्टर पुरुषोत्तम तायडे याला रामदास पेठ पोलिसांनी अटक केली असून त्याच्या विरोधात रामदास पेठ पोलीस स्टेशन मध्ये 354, 376,C (D) L, 377 कलम खाली गुन्ह्या नोंदविला. विशेष बाब म्हणजे पीडिता ही विकलांग असल्याने या नराधम डॉक्टरावर रोष व्यक्त होत आहे सदर ची कारवाई रामदास पेठ पोलीस स्टेशन चे ठाणेदार आव्हाळे, PSI नरेंद्र नरेंद्र पद्मने, प्रशांत इंगळे, श्रीकांत पतोंड, विशाल चव्हाण यांनी केली

Leave a Comment