सिंदखेडराजा सुरेश हुसे
स्प्लेंडर मोटरसायकलने सिनेस्टाईल पाठलाग करून आणि डोळ्यात मिरची पावडर टाकून एकूण ३ चोरट्यांनी किनगावराजा येथील विष्णू पंढरीनाथ काकड यांच्याजवळील सुमारे ४ लाख ४३ हजार ३७२ रुपयांची रोख रक्कम लुटली असून या घटनेने किनगावराजा परिसरात एकच खळबळ उडाली आहे.#crimenews
फिर्यादी विष्णू काकड हे येथील टापरे सुपरमार्केट दुकानात कामावर असून दिनांक १९ ओक्टॉबर रोजी बीबी,मलकापूर पांग्रा व दुसरबीड येथून उपरोक्त रक्कम घेऊन येत असतांना संध्याकाळी ६.१५ च्या दरम्यान तढेगाव फाटा ते राहेरी पुला दरम्यान विष्णू काकड यांच्या मागावर असलेल्या हिरो स्प्लेंडर मोटर सायकलवरून अज्ञात ३ चोरट्यानी विष्णू काकड यांच्या गळ्यातील डिक्कीवर असलेली पैशाची बॅग ओढण्याचा प्रयत्न केला.#chori
यावेळी चोरट्यांना प्रतिकार करतांना काकड खाली पडले असता चोरट्यांनी त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून त्यांच्याजवळील बॅगेतील एकूण ४ लाख ४३ हजार ३७२ रुपयांची रोख रक्कम लुटली व घटनास्थळावरून पोबारा केला.#cmomaharashtra
विष्णू काकड यांनी त्यांच्यासोबत घडलेल्या घटनेचे पोलीस ठाण्यात कथन केले असता त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात ३ चोरट्यांवर किनगावराजा पोलीस ठाण्यात कलम ३९४,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तात्पुरता प्रभार स्वीकारलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज रबडे व पोलीस हेड कॉन्स्टेबल रमेश गोरे हे पुढील घटनेचा तपास करीत आहेत.