सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )
१९ फेब्रुवारी रोजी मेहकर येथे तथागत युवा प्रतिष्ठान ग्रुप महाराष्ट्र राज्य च्या वतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मेहकर येथील छञपती शिवाजी महाराज उद्यान मध्ये तथागत युवा प्रतिष्ठान ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा.संदिप भाऊ गवई यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतीमेला माल्यार्पण करत आदरांजली अर्पण केली. पुण्यवंत, नितिवंत, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज आपला मानबिंदु आहेत. महाराजांचे शौर्य, त्यांचा प्रताप, त्यांचा बाणा, त्यांची शिकवण अंगिकारणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल असे तथागत युवा प्रतिष्ठान ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा.संदिप भाऊ गवई यावेळी म्हणाले.
यावेळी तथागत फाउंडेशन व तथागत ग्रूप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा,श्री.संदिप भाऊ गवई , मा.सुभाष भाऊ बैलके, मा.अनिल भाऊ देबाजे मा.अख्तर भाई कुरेशी,कुणाल भाऊ माने, कैलास दुगाने,राजकुमार उचित, कपिल इंगळे,प्रमोद अंभोरे विजय सरकटे,समाधान पवार,अस्सलम भाई गवळी,पंकज जाधव,समाधान पवार,सचिन बनचरे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.



![check bounce case/धनादेश अनादर प्रकरणी एकास २ महिने शिक्षा व ८५ हजार रु.दंड. [ शेवटी फिर्यादी मयताचे वारसास अखेर न्याय मिळाला.]](https://i0.wp.com/www.suryamarathinews.com/wp-content/uploads/2026/04/20260401_212526.jpg?resize=218%2C150&ssl=1)



