आजीला बसस्थानकावर सोडायला आलेल्या युवतीचा फोटो काढणार्या युवक रोड रोमिओला नागरिकांनी चांगलाच धडा शिकवला. फोटो काढणे पडले महाग नागरिकांना चोप देत त्याला पोलिसांच्या हवाली केले. ही घटना काल घडली.
सादिक खान अमजद खान (रा. लोणार) असे आरोपीचे नाव आहे. दुसरबीड येथील युवती बस स्टॅन्ड वरती आजीला सोडण्यासाठी देऊळगाव राजा बसस्थानकावर आली होती. दुसरबीडला जाण्यासाठी बसमध्ये आजीला बसवून देत असताना सादिक खानने तिचा फोटो काढला. होता ही बाब युवतीच्या लक्षात आल्याने तिने त्याला जाब विचारला असता त्याने उडवाउडवीचे उत्तर दिले. यावेळी सोबत असलेल्या युवतीच्या मावस बहिणीने त्याला मोबाइल दे आम्ही तपासतो म्हटले तर तो मोबाइलही देईना. मुलीने मोबाइल हिसकावून बघितले असता मुलीचे फोटो काढल्याचे दिसून आले. या सर्व वादात नागरिकही जमा झाले. त्यांनी सादिकला नागरिकांना दिला चोप देेत पोलिसांच्या हवाली केले. युवतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी सादिकविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.