Home Breaking News तलाठी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पौंधे यांना मारहाण , आरोपी विरुध्द गुन्हा...

तलाठी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पौंधे यांना मारहाण , आरोपी विरुध्द गुन्हा दाखल

589
0

 

 

(साखरखेर्डा )

येथील मंडळाधिकारी कार्यालयात कामकाज करीत असतांना एका इसमाने कार्यालयात घुसून तलाठी पोंधे यांना मारहाण करुन चावा घेतला . आणि सामानाची नासधूस केल्या प्रकरणी आरोपीस विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
साखरखेर्डा येथील पाण्याच्या टाकी जवळ तलाठी आणि मंडळाधिकारी कार्यालय असून या कार्यालयात प्रशांत शंकरराव पोंधे आणि संजय शिंगणे हे कामकाज करीत होते . दुपारी १२ वाजताच्या सुमारास मोहन दत्तू गवई रा . हिवरखेड ता . खामगाव यांचा मोबाईल वर फोन आला . पोंधे यांना भेटायचे आहे . मी कार्यालयात आहे , आपण भेटू शकता . त्यानंतर काही वेळातच सदर व्यक्ती कार्यालयात आला .आणि पोंधे कोन आहेत , त्यांना मला भेटायचे आहे . तलाठी यांनी परिचय देवून माझ्या सोबत काय काम आहे . ते सांगा . दत्तू गवई हे माझे वडील असून त्यांच्या खात्यात अनुदान जमा झाले नाही . अनुदान यादी पाहून सांगतो असे पोंधे यांनी म्हणताच मोहन गवई यांनी शिवीगाळ करून पोंधे यांना खुर्चीतून ओढून खाली पाडले . लाथाबुक्क्यांनी मारहाण करून प्रिंटर मशिन दोन्ही हातात धरुन जमिनीवर आदळले . त्याच्या तावडीतून सुटका करीत असतांना पोंधे यांच्या डाव्या हाताच्या आंगठ्याला कडाडून चावा घेतला . बोटातून रक्तश्राव झाला . गवई आणि पोंधे यांना सोडविण्यासाठी तलाठी संजय शिंगणे , कोतवाल शुभम अशोक कोतवाल , एकनाथ तुपकर यांनी पोंधे यांना सोडविले .
तलाठी प्रशांत पोंधे यांच्या तंक्रारीवरुन साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी आरोपी मोहन दत्तू गवई वय ४० वर्ष रा हिवरखेड , ता . खामगाव , जि . बुलडाणा यांच्या विरुद्ध विविध कलमाखाली आणि सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतीबंधक अधिनियम कायद्या नुसार गुंन्हे दाखल केले आहेत .

Previous articleरविकांत तुपकरांनी घेतली ऊर्जामंत्री ना.नितीन राऊतांची भेट.
Next articleघरगुती वादातून महिलेची हत्या मारेकरी आरोपी ताब्यात :  पोलिसांचा तपास सुरू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here