तीर्थक्षेत्र पोहरागड ते मंत्रालय मुंबई रमेश पवारची पदयात्रा -एक चिंतन:

 

तुकाराम राठोड,जालना

प्रतिनिधी:(जालना)तीर्थक्षेत्र पोहरागड हे 15 कोटी गोर बंजारा समाजाचे काशी असुन प्रवित्र श्रद्धास्थान आहे.भारताच्या अनेक राज्यातूनच नव्हे तर विदेशातूनही पोहरागड येते भाविक भक्त येतात आणि क्रांतीसुर्य संत सेवालाल महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन नतमस्तक होतात.क्रांतीसुर्य सेवालाल महाराज हे विज्ञानवादी होते.त्यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1739 मध्ये आंध्रप्रदेशातिल स्वर्णकोपा या गावी झाला असून, त्यांनी भारत भ्रमण करून गोरबंजारा समाजाला एकसंघ ठेवण्यासाठी आणि विज्ञानवादाकडे नेण्यासाठी ते आपल्या वाणीतून लोकाला संदेश देत असत.जाणजो…छाणजो…पच माणंजो! अशा महान संतांचे जन्मदिनी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी देण्यात यावी.या मागणीसाठी रमेश उर्फ सोनू उत्तम पवार राहणार उमरी तालुका मानोरा जिल्हा वाशिम हा मुलगा(युवक) 26 सप्टेंबर 2022 रोजी धनराज राठोड ला सोबत घेऊन पोहरागडावरून मुंबई येथील मंत्रालयाकडे पदयात्राने जात आहे.गोरबंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांच्या 15 फेब्रुवारीला जयंतीदिनी शासकीय सुट्टी मिळावी.ही मागणी घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.एकनाथरावजी शिंदे साहेब तसेच उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना भेटून हा मुलगा निवेदन देणार आहे.खरंच रमेश पवार यांचे आपण कौतुक केले पाहिजे.आज गोरबंजारा समाजामध्ये विविध संघटना,नेते पुढारी,विचारवंत,बुद्धिजीवी ही सर्व मंडळी असताना कोणाच्याही मनात 15 फेब्रुवारीला शासकीय सुट्टी मिळावी.यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्याला भेटून निवेदन द्यावे.असे कोणाच्याही मनात आलेले नसताना मात्र रमेश उत्तम पवार या मुलांच्या मनात ही गोष्ट यावी ही गोरबंजारा समाजासाठी फार मोठी उपलब्धी म्हणावी लागेल! 26 सप्टेंबर 2022 रोजी पोहरागड येथील महान संत सेवालाल महाराज यांचे दर्शन घेऊन मंत्रालय मुंबईकडे निघालेला हा रमेश पवार यांच्या हिमतीला दात द्यावी लागेल. खरंच गोरबंजारा समाजामध्ये खेड्यापाड्यात सुद्धा अनेक विचारवंत रमेश पवार सारखे आहेत हे या घटनेवरून दिसून येते.पोहरागड येथे हजारो भाविक भक्त दरवर्षी रामनवमी यात्रेला येतात.इतके महत्त्व या पोहरागडाला आहे.एक दोन कोटी लोकसंख्या असलेल्या जातीच्या संताच्या जन्मदिनी शासनाने सुट्टी जाहीर केलेली असून गोरबंजारा समाजाची भारतामध्ये जवळपास 15 कोटी लोकसंख्या असताना सुद्धा राज्य व केंद्र शासनाने याबाबतची दखल घेतलेली नसल्यामुळे ही गोष्ट हेरून हा सेवालाल भक्त रमेश पवार या मागणीसाठी तो मंत्रालयाकडे पैदल निघालेला आहे.पोहरागडावरून निघताना त्यांचे फार जल्लोसात स्वागत केलेले असून गावोगावी हा सेवालाल भक्त रमेश पवार यांचे जंगी स्वागत होत आहे. हा जवळपास 700 ते 800 किलोमीटरचा प्रवास रमेश पवार पदयात्रेंनी करणार असून ऊन, पाऊस याची पर्वा न करता आपले जीवन सेवालाल चरणी समर्पित करून तो चांगल्या भावनेने मुंबईकडे निघालेला आहे. दररोज तो 25 ते 30 किलोमीटर अंतर कापत आहे.तो जवळपास 21 ते 22 दिवसात मुंबई ला पोहचेल. आज तो बिबी वरून सिंदखेडराजा कडे निघालेला आहे. आणि सिंदखेडराजा येथे मुक्काम आहे.. ही फार मोठी गोरबंजारा समाजासाठी उपलब्ध असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी रमेश पवार यांच्या पदयात्रेची दखल घेऊन 15 फेब्रुवारी ला संत सेवालाल महाराजांच्या जन्मदिनी शासकीय सुट्टी जाहीर करावी अशी जनसामान्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.रमेश पवार यांचे कौतुक करणे हे शब्दात बसत नाही.रमेश पवार यांच्या पदयात्रेला कोटी कोटी शुभेच्छा. संत सेवालाल महाराज संत जेतालाल महाराज सामकीयाडी आपणास विनंती करतो की आपला भक्त मुंबईकडे निघालेला आहे. त्याची सर्वतोपरी काळजी घ्यावी,हीच प्रार्थना.
नोट—मी गावोगावीच्या लोकांना विंनती करतो की ,रमेश पवार आपल्या गावात आल्या बरोबर आपण निदान तासभर तरी त्यांच्या सोबत चालावे जेणेकरून त्यांच्या पदयात्रेला बळकटी मिळेल.आणि शासनाने शुद्धा या पदयात्रेची दखल घेऊन त्याला आरोग्य सुविधा पुरवावी.
!!जय सेवालाल,जय वसंत!!
रमेश पवार-मो.नंबर-9765092059.

Leave a Comment