त्या चिमुकल्यांना हवी आहे माणुसकीची सात,समाजातील दानशूर व्यक्तीने पुढे येण्याची गरज असे आवाहन सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.

 

Jalna (तुकाराम राठोड)

जालना-वाटुर-अधार बहुउउदेशिय सेवाभावी संस्था जालना या संस्थेमार्फत प्रत्येक वर्षी 05 टिकाणी वीटभट्टी व साखर कारखाना ३ ते ६ वयोगटातील बालकांच्या करीता ( डे – केअर सेंटर) चालविल्या जातात.या वर्षी देखील संस्थेने जालना जिल्हयातील 2 साखर कारखाना कार्यस्थळावरील ऊसतोड कामगारांच्या बालकांच्या करीता डे केअर सेंटर सुरु आहेत.

तसेच परतुर मंठा जालना घनसावंगी येथील वीटभट्टी कार्यस्थळावर 08 या टिकाणी डे केअर सेंटर सुरु केले आहेत.यामध्ये ३ ते ६ या वयोगटातील 167 तसेच ६ ते १४ वयोगटातील 584 बालकांना शाळेच्या प्रक्रियेत आणण्याचे काम करीत आहोत.757 बालकांना उबदार कपड्यांची गरज आहे.

सधा खूप थंडी असल्यामुळे थंडीत कुडकुडणाऱ्या वीटभट्टी व उसतोड कामगारांच्या चिमुक्यांना संरक्षण मिळावे.या करीता अधार बहुउउदेशिय सेवाभावी संस्था जालना संस्थेमार्फत जिल्ह्यातील दानशूर व्यक्ती,सामाजिक संस्था,शैक्षणिक संस्था,पदाधिकारी इत्यादी.वीटभट्टी व ऊसतोड कामगारांच्या मुलांकरीता थंडीत कुडकुडणाऱ्या जीवांना कपड्याच्या माध्यमातून माणुसकीची उब देण्यासाठी अधार संस्था आपल्याला आवाहन करीत आहेत.

या उपक्रमात सहभागी होवून उबदार कपडे,स्वेटर,ब्लॅकेट,शैक्षणिक सहित्य स्वरुपात अधार संस्था वाटुर मो.9421327814/8888853624 या वर संपर्क करूण अपन मदत करू शकतात.तसेच संकलीत झालेले स्वेटर,ब्लॅकेटस शैक्षणिक सहित्य जालना,जिल्ह्यातील वीटभट्टी व ऊसतोड कामगारांच्या 757 बालकांना वाटप करण्यात येणार आहे.

वीटभट्टी ऊसतोड कामगारांच्या कुंटूंबाना ब्लॅकेटस वाटप करण्यात येणार आहे.या सामाजिक कार्यात आपला देखील सहभाग हवा आहे.या कार्यक्रमाचे संयोजक पोग्राम ऑफिसर राजेश राउत,सुरेश बच्छीरे,एकनाथ किटाळे,विठ्ठल सुभेदार,सचिन चव्हाण,राजेश वाघमारे,चंदु कवळे व सामाजिक कार्यामध्ये सहभागी होऊन बालकाना उब देऊ शैक्षणिक सहित्य व समुपदेशन करूण शैक्षणिक प्रवाहात आण्यासाठी प्रयत्न केली जाणार आहे.

श्रीमती अनिता राऊत अध्यक्ष अधार बहुउउदेशिय सेवाभावी संस्था जालना.चला तर आपण देखील सहभाग व्हा…..🙏🏻

Leave a Comment