दहा दिवशीय श्रामनेर शिबीराची यशस्वी सांगता

 

मूर्तिजापूर – तालुक्यातील ग्राम खापरवाडा येथे आयोजित दहा दिवशीय श्रामनेर शिबीराची पुज्य भन्ते गण व हजारो बौध्द उपासक ,उपासिका यांच्या उपस्थितीत यशस्वी सांगता झाली.

भारतीय बौध्द महासभा जिल्हा अकोला शाखा अंतर्गत ग्रामशाखा खापरवाडाचे विद्यमाने दहा दिवशीय श्रामनेर शिबिराचे मानवता प्रगती बौध्द विहार येथे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबीरात बौध्दाचार्य श्रामणेर प्रशिक्षण शिबिर ,उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिर ,समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिर अश्या तिन प्रकारच्या शिबीराचा समावेश होता.

या शिबीराचे प्रमुख मार्गदर्शक पुज्य भन्ते बुध्दपालजी महाथेरो यांच्या उपस्थितीत गावातील तसेच आजुबाजुच्या परिसरातील ३० -३५ युवकांना श्रामनेराची दीक्षा देण्यात आलीदहा दिवस चाललेल्या शिबिरात रोज सकाळी बुद्ध वंदना दिवसभर व रात्रीच्या सात ते दहा या वेळेत प्रवचन अशा विविध बौद्धमय कार्यक्रमाने खापरवाडा नगरी दुमदुमून गेली होती सदर शिबिराचे नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने आणि धम्म आणि धम्मच या गोष्टीची योग्यरीत्या अंमलबजावणी करून केलेल्या नियोजनात भारतीय बौद्ध महासभा अकोला टीम कडून नियोजना बाबत आयोजन टीम वरती कौतुकास्पद थाप देण्यात आली.

जिल्हाभर सदर नियोजनाचे कौतुक होत असल्याचे बोलल्या जात आहे पूजनीय भदन्त बी-संघपालजी महाथेरो, व्यवस्थापक चैत्यभूमी मुंबई, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा भारतीय बौद्ध महासभेच्या भिक्खू संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या प्रवचनाचा आजूबाजूच्या परिसरातील बौद्ध उपासक उपासिकांनी लाभ घेतला.

लाईफ केअर हॉस्पिटल मूर्तिजापूरचे संचालक डॉ. आशिष चक्रनारायण (एमडी) यांच्या सहकार्याने दिनांक ३० मार्च रोजी भव्य रोग निदान शिबिर व ३१ मार्चला रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. दोन्ही शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अशी माहीती आयोजक मंडळाचे प्रमुख सतिश गवई यांनी दिली.
—————-
*कॅमेरान श्याम वाळस्कर सह प्रतिक कुऱ्हेकर सूर्या मराठी न्यूज अकोला*

Leave a Comment