Home बुलढाणा देऊळगाव माळी येथे सरपंचपदी .किशोर गाभणे तर उपसरपंचपदी रंगनाथ चांळगे यांची निवड...

देऊळगाव माळी येथे सरपंचपदी .किशोर गाभणे तर उपसरपंचपदी रंगनाथ चांळगे यांची निवड !

504
0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

मागील दीड महिन्यापासून सुरु असलेल्या लोकशाहीच्या उत्सवाची आज पहिल्या टप्प्यात मेहकर तालुक्यात जिल्ह्यात दीडशेहून अधिक गावात सरपंच उपसरपंच निवडले आहे. मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या ग्रामीण राजकारणाची व राजकारण्यांची आज फायनल मॅच झाली. आजच्या दिवसासाठी गाव पुढारी आणि कसोटीच्या सामन्यासारखी मेहनत घेतली. अशा उमेदवारांची आज मिनी मंत्रालय म्हणून समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत वर शपथ विधी व पदग्रहण सोहळा संपन्न झाला.मेहकर तालुक्यातील
देऊळगाव माळी येथे दिनांक ९ फेब्रुवारी रोजी सुद्धा मोठ्या थाटामाटात नवनियुक्त सदस्य सरपंच उपसरपंच यांचा पदग्रहण व शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी विस्तार अधिकारी श्री पादरे साहेब, पंचायत समिती निवडणूक निर्णय अधिकारी राम नवघरे, ग्रामसेवक मस्के साहेब, तलाठी पऱ्हाड या शासकीय अधिकाऱ्यांच्या नियंत्रण रेखी खाली 2 च्या ठोक्याला विशेष सभेला प्रारंभ झाला. यावेळी 13 सदस्यांपैकी महा विकास आघाडी परिवर्तन पॅनलचे चे सर्वच्या सर्व10 नवनियुक्त सदस्यांमधून सरपंच व उपसरपंच बिनविरोध निवड करण्यात आली. त्यामुळे देऊळगाव माळी चे सरपंच पद श्री किशोर विश्वनाथ गाभणे तर उपसरपंच श्री रंगनाथ हरिभाऊ चाळगे हे सांभाळणार आहे.
सरपंच निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाने माखलेले ढोल, ताशा वाजवून फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी प्रशासन व सुव्यवस्था राखण्याचे काम मेहकर पोलीस स्टेशन चे बीट जामदार मस्के साहेब, व रामेश्वर रिंढे, पोलीस पाटील गजानन चाळगे यांनी पार पाडले.

Previous articleगळफास घेऊन तरुणांची आत्महत्या !
Next articleसाखरखेर्डा येथील सर्वसाधारण सरपंचपदाची निवडणूक 11 फेब्रुवारी रोजी .पक्षाची एकनिष्ठ राहिलेले सय्यद रफीक यांना पहिल्या टर्म मध्ये संधी मिळेल काय ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here