देवरी चेक पोस्टवर ४० किलो गांजा जप्त; आरोपीस अटक

 

देवरी,दि.10:-राष्ट्रीय महामार्गावरील सीमा शुल्क तपासणी नाका शिरपूर/बांध येथे देवरी पोलिसांनी आज दुपारी ४ वाजता सुमारास रायपूर कडून नागपूर कडे जात असलेल्या सहा चाकी वाहनाची झळती घेतले असता त्या वाहनात ४७ किलो गांजा आढळून आल्याने तालुक्यातील ही मोठी कारवाई देवरी पोलिस स्टेशनच्या ठानेदारांनी केल्याची चर्चा सुरू असून अवैध धंधे करणा-यांचे या कारवाईमुळे मुस्के आवरणार असल्याचे बोलले जात आहे.

सविस्तर असे की, देवरी पोलिस स्टेशनचे ठाणेदार रेवचंद सिंगनजुडे यानां सूत्रांकडुन मिळालेल्या माहितीच्या आधारावर देवरीचे थानेदार व सहकारी शिरपूरबांध येथील सीमाशुल्क तपासणी नाक्याकडे रवाना झाले. पोलिसांनी वाहन तपासणीला सुरवात करताच सहाचाकी वाहन क्रमांक MH 04 KU 4068 या वाहनात ४७ किलो गांजा आढळून आला. या गांजाची किंमत बाजारात अंदाचे ४ लाख ७० हजार रुपये सांगण्यात येत आहे. सदर आरोपीला देवरी पोलिसांनी ताब्यात घेतले असून तपास ठानेदार सिंगनजुडे करीत आहेत.

देवरी पोलिसांनी जप्त केलेला ४७ किलो गांजा किंमत ४ लाख ७० हजार रुपये, वाहन किंमत १५ लाख रुपये असा एकूण १९ लाख सत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करत आरोपीला ताब्यात घेतले आहे.

Leave a Comment