देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती पराक्रम दिनी शासन प्रशासनाच्या निषेधार्थ आझाद हिंद महिला संघटनेच्या रणरागिन्यांच्या भव्य आक्रोश निषेध मोर्चाने बुलढाणा शहर दनानले.

 

बुलढाणा.राज्यसह जिल्ह्यांतील अवैद्य धंदे बंद करा, शासकीय जागेत अवैध धंद्यांना परवानगी देणारे अधिकारी, महिलांचा आवमान करणारे होम डिवायएसपी ताथोड, जळगाव जामोद पीएसआय घोडेस्वार, उपवनसंरक्षक अक्षय गजभिये, टाकळी विरो ग्रामसेवक सावकारे यांच्या मालमत्तेची चौकशी करून नियमानुसार कारवाई सह त्वरीत बदली करण्यात यावी.

नाबालिक मुलींचे अपहरण थांबवून दोन वर्षातील आकडेवारी जाहीर करावी,शहरात महिलांसाठी सार्वजनिक ठिकाणी प्रसाधनगृहांची व्यवस्था करावी, शहरात रोडवरील बाहेर आलेले लोखंडी गज व खोदलेले रोड दुरुस्त करावे, रेशन दुकानदारांचा काळाबाजार थांबवा, यापूर्वी आझाद हिंदने दिलेल्या तक्रारी, मागण्यांची पूर्तता करावी यासह ईतर ज्वलंत मागण्यांसाठी आझाद हिंद महिला संघटनेच्या प्रदेश संपर्कप्रमुख सुरेखाताई निकाळजे यांच्या नेतृत्वात 23 जानेवारीला भव्य आक्रोश निषेध मोर्चा निघाला.

शहरातील जयस्तंभ चौक, मुख्य बाजार लाईन, सराफा चौक, कारंजा चौक, तहसील चौक या प्रमुख मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला. त्या ठिकाणी मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. सदर सभेत आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.सतीशचंद्र रोठे, विदर्भ संपर्कप्रमुख शेख सईद, महिला संघटनेच्या प्रदेश संपर्कप्रमुख सुरेखाताई निकाळजे, जिल्हाध्यक्षा नलिनीताई उन्हाळे, मनीषा झांबरे, सिंधुताई अहेर, वर्षाताई ताथरकर, यांनी शासन प्रशासनाच्या गलथान कारभारावर सडेतोड प्रहार केला.

त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील, जिल्ह्यातील पंधरा मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. त्यामध्ये देशगौरव नेताजी जयंती केंद्राच्या अध्यादेशानुसार पराक्रम दिवस म्हणून साजरी न करणाऱ्यांवर करावाई करावी, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा, सिंचन योजना त्वरित पूर्ण करावी, जिगाव प्रकल्पाच्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी.

यासह ईतर मांगन्याचे निवेदन सादर करण्यात आले. आक्रोश निषेध मोर्चामध्ये पिडीत शेकडो महिला मुलींची उपस्थिती, चित्ररथ, बॅनर,पोस्टर, भव्य रथामध्ये नेताजींच्या प्रतिमेसह देशगौरव नेताजी,राणी लक्ष्मीबाई सहगल,सावित्रीबाई फुले राष्ट्रमाता जिजाऊ साहेब, छत्रपती शिवराय यांच्या वेशभूषेतील भूमिका विशेष आकर्षण ठरली. शहरातील प्रत्येक चौकात व्यापारी,नागरिक महिलांकडून आझाद हिंदच्या रणरागिण्यांचा पुष्पवर्षाव करून स्वागत सत्कार करण्यात आले.
________________

 

Leave a Comment