दोन थेंब प्रत्येक वेळी पोलिओवर विजय मिळावा वेळोवेळी

0
650

 

नांदुर:-(प्रफुल्ल बिचारे पाटिल )

आज रविवार दिनांक ३१ जानेवारी २०२१ रोजी आरोग्य विभाग तर्फे ० ते ५ वयोगटातील बालकांना पोलिओ डोस देण्याची मोहीम राबविण्यात आली.प्राथमिक आरोग्य केंद्र नांदुरा यांच्या सौजन्याने ओमसाई फाउंडेशन नांदुरा यांच्या पोलिओ डोस बुथवर मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री.राजेश एकडे यांनी चि.रनविरसिंग निलेश वतपाळ याला पोलिपो डोस देऊन या अभियानाचा शुभारंभ केला.या कार्यक्रमात नांदुरा नगर परिषद चे पाणीपुरवठा सभापती श्री.अजय घनोकर,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अभिलाष खंडारे, डॉ.लक्ष्मीनारायण जैस्वाल,
ओमसाई फाउंडेशन चे श्री.विलास निंबोळकर,पत्रकार श्री.प्रवीण डवंगे , श्री.यशवंत पिंगळे प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here