धानाला बोनस जाहिर – खा. प्रफुल पटेल यांच्या आश्वानाची पुर्तता प्रति क्विंटल 700 रुपये मिळणार बोनस

 

गोंदिया-शैलेश राजनकर

गोंदिया / भंडारा: धान उत्पादक शेतकऱ्यांना मागील वर्षा प्रमाणे यंदा ही खरीप हंगामात धानाला प्रति क्विंटल 700/- रुपये बोनस देऊ अशी ग्वाही खासदार प्रफुल पटेल यांनी दोन्ही जिल्हयातील शेतकऱ्यांना दिली होती. त्याच आश्वानाची पूर्तता त्यांनी केली. राज्यातील महाविकास आघाडी सरकार ने धानाला 700/- रुपये बोनस देण्याचे राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत जाहीर केले. याचा गोंदिया भंडारा जिल्हया सह पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.
पूर्व विदर्भात सर्वाधिक धानाची लागवण केली जाते.त्यातच गोंदिया आणि भंडारा हे दोन्ही जिल्हे केवळ धान उत्पादक जिल्हे आहे. या दोन्ही जिल्हयाची अर्थ व्यवस्था प्रामुख्याने शेतीवरच अवलंबून आहे. मागील 3 – 4 वर्षा पासून धानाचा लागवड खर्चात मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र त्या तुलनेत धानाला हमी भाव मिळत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होत चालला
याचीच दखल घेत लगतचा मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ राज्याचा धर्तीवर पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना 2500/- प्रतिक्विंटल दर मिळवून देण्याची घोषणा मागली वर्षा विधानसभा निवडणूकीच्या दरम्यान राष्ट्रवादी काॅंग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष शरदराव पवार यांच्या उपस्थितीत गोंदिया येथे खासदार प्रफुल पटेल यांनी केली होती. या नंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडी चे सरकार आल्या नंतर धानाला 700/- रुपये प्रति क्विंटल प्रथमच बोनस जाहिर करण्यात आला त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 2500/- रुपये हमी भाव मिळाला. मात्र यंदा कोरोना मुळे सरकारच्या तिजोरीत ठनठनात असल्याने आणि बोनस जाहिर केल्यास सरकारच्या तिजोरी वर 1400 कोटी रुपयांचा भार येणार होता. त्यामुळे यंदा बोनस मिळणार की नाही याची शंका होती, मात्र खासदार प्रफुल पटेल यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांना मागील वर्षा प्रमाणे यंदाही धानाला बोनस जाहिर केला जाईल अशी ग्वाही खासदार प्रफुल पटेल यांनी दिली होती.

Leave a Comment