पिडित माता पिता महिला आयोगाकडे तक्रार करणार.
बुलढाणा अपहरण झालेली नाबालिक मुलगी स्वतःहून पोलीस स्टेशनला जमा झाल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात येत आहे. अद्यापही मेडिकल झालेले नसून तिला बाल सुधार गृहात कसे ठेवण्यात आले..?
स्थानिक जळगाव जामोद पोस्टे अंतर्गत मुलगी अपहरण प्रकरणात स्वतःहून पोलीस स्टेशनला हजर आल्याची चुकीची माहिती जाणीवपूर्वक जाहीर करण्यात येत आहे.
तसेच स्थानिक जळगाव जामोद सामान्य रुग्णालयत प्राथमिक मेडिकल झाल्यानंतर नाबालिक मुलीला बुलढाणा येथील बालसुधार गृहात ठेवण्यात आले आहे. असे असताना तिला खामगाव येथे मेडिकलला नेण्याचे कट कारस्थान पोलीस प्रशासनाकडून होत असल्याचे समोर येत आहे.
स्थानिक तपास अधिकाऱ्यांच्या सांगण्याप्रमाणे मुलगी स्वतःहून हजर झाली तिला आम्ही शोधले नाही. मग तपास अधिकारी जळगाव खान्देश, औरंगाबादमध्ये शासकीय दौरा टाकून कशासाठी गेले..? जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय अंतर्गत नेमण्यात आलेले वेगवेगळे पथक रिकाम्या हाताने परतले काय…?
मुलगी स्वतःहून आली त्यानंतर तिला तिच्या आई-वडिलांसोबत भेटू दिल्या जात नाही. राजकीय दबाव तंत्राचा वापर सदर तपासा दरम्यान होत आहे. आई-वडिलांना मुली पासून जाणीवपूर्वक लांब ठेवण्यात येत आहे.
मूलीला बुलढाणा येथील बाल सुधार गृहात आणल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. तर रात्री अडीच वाजता मुलाला अटक केल्याचेही माहिती समोर येत आहे.
सदर प्रकरणात आमदार संजय कुटे यांचा पोलीस प्रशासनावर दबाव असल्यामुळे तपास यंत्रणा ” हम करे सो कायदा ” या पद्धतीने आरोपीला वाचविण्यासाठी चुकीच्या दिशेने काम करत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक स्थानिक ठाणेदार तपास अधिकारी सदर प्रकरणात प्रतिक्रिया देण्यास का टाळत आहे का समोर येत नाही.
तीन महिन्यात मुलगी परत आली नाही आणि आज अचानक मुलगी स्वतःहून पोलीस स्टेशनला हजर होते. त्यानंतर मुलाला अटक होते.हा सर्व प्रकार आरोपी माजी मंत्री आमदार संजय कुटेंचा ड्रायव्हर असल्यामुळे त्याला वाचविण्यासाठी होत आहे. तसेच मुलीवर दबाव आणून मुलीचे बयान नोंदविला जात असल्याचा प्रकार घडत असल्याचे पीडित मुलीचे मातापित्यांचे म्हणणे आहे.
Dr Sanjaykute