निपुण भारत अभियान अंतर्गत माता-पालक गटाची बैठक आणि बालआनंद मेळावा फराडा येथे मोठ्या उत्साहात संपन्न.

 

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक

चामोर्शी: आज दिनांक २३ जानेवारी रोजी पंचायत समिती चामोर्शीच्या अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा फराळा,केंद्र-भेंडाळा येथे निपुण भारत अभियान अंतर्गत
बाल आनंद मेळावा आणि महिलांसाठी माता पालक गटाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरज मशाखेत्री हे होते तर उद्घाटक म्हणून सौ शालीनी उंदीरवाडे ह्या होत्या.मुख्य मार्गदर्शक गट साधन केंद्र चामोर्शीचे विषय साधनव्यक्ती श्री चांगदेव सोरते हे होते.

तर प्रमुख पाहुणे संगीताताई भोयर,विजयाताई रोहनकर,बेबीबाई चुधरी,सौ शारदाबाई राऊत,रवी पेंदोर,सौ करीश्मा पेंदोर,शाळेचे मुख्याध्यापिका सौ वंदना ठवरे,कोठोरे मॅडम,कोडकिलवार मॅडम,श्री संजय कुमरे,श्री गौतम क्रिष्णा,श्री पदा सर, विषय साधनव्यक्ती श्री विवेक केमेकर,संसाधन शिक्षक श्री रवी खेवले,क्रिष्णा लांबाडे,मॅजीक बस चे समन्वयक योगीता सातपुते, रोशन तिवाडे ,उत्तम देखमुख, श्री बाबुराव देहलकर उपस्थित होते.प्रश्नमंजुषा(ओळखा पाहू).प्रश्न आमचे,उत्तर तुमचे(सामान्य ज्ञान),कोण होणार उत्कृष्ट विद्यार्थी.गणितीय प्रश्न(करू या मैत्री गणिताशी).काळ ओळखा,केवळ पुस्तकी ज्ञान म्हणजे शिक्षण नाही तर विद्यार्थ्यांना ताण-तणावापासून मुक्त ठेवण्यासाठी आणि आनंददायी जीवन जगण्यासाठी इतरही कौशल्य विकसित करणे गरजेचे आहे.

प्रश्नांमधून ज्ञानाची, आकलनाची,कल्पनांची आणि विचारांची दारे खुली करण्यास मदतगार ठरते.प्रश्नांच्या उकलतेमुळे अडथळे दूर होतात.मुलांच्या चेहऱ्यावरील हसू व तेज दिसतो,त्यातूनच आत्मविश्वासात वाढीस लागते.प्रश्नांचे उकल झाल्याने अडथळ्यांचा मार्ग सुकर होण्यास मदत होते.

विषय साधनव्यक्ती चांगदेव सोरते यांनी गंमत-जंमत मधून प्रश्नमंजुषा उपक्रम घेतले त्यामध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शाळेच्या वतीने माता पालकांसाठी शैक्षणिक वान(नोटबुक आणि पेन) उपलब्ध करण्यात आले.विद्यार्थी आणि मातांसाठी संगीत खुर्चीचे आयोजन करण्यात आले.विद्यार्थ्थांसाठी गणित विषयांचे ज्ञान कौशल्य विकसित होण्यासाठी खरी कमाई हा उपक्रम राबविण्यात आले.विविध प्रकारचे स्टॉल्स लावण्यात आले.

भरगच्च कार्यक्रमामध्ये सहभागी गावकऱ्यांनी उत्सुर्त प्रतिसाद घेतला,जवळपास चारशे ते पाचशे लोकांनी कार्यक्रमाचा भरपूर आस्वाद घेतला.

Leave a Comment