पन्नास रुपयासाठी मित्रानेच केला मित्राचा खून

 

 

हिंगणघाट शहरातील बिडकर वार्ड येथे पैशाचे देवान-घेवानीवरुन मित्रानेच मित्राचा निरघुन खून केल्याची घटना काल शनिवार रोजी रात्री ९ वाजताचे दरम्यान घडली.
मृतक सतीश प्रभाकर वरुलकर(४२) याने त्याचा मित्र आरोपी सचिन प्रभाकर पेंदाम(३२ )याचे पत्नीकडून ५० रुपये उधार घेतले होते,अनेकवेळा मागूनसुद्धा सतीश याने पैसे परत न केल्याने रागावलेल्या आरोपीने काल रात्री ९ वाजताचे दरम्यान लाकडी राफ्टरने जोरदार प्रहार करुन गंभीर जखमी केले.
जखमी सतीश यास रक्तबंबाळ परिस्थितित स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले,त्याला पुढील उपचारार्थ सेवाग्राम येथे नेत असतांना त्याचा मृत्यु झाला.
मृतक गेल्या १ वर्ष्यापासून बिडकर वार्ड येथे राहुल काळपांडे यांचेकडे भाडयाने राहत होता,पोलिसांना घटनेची माहिती मिळताच आरोपी
सचिन पेंदाम यास पोलिसांनी अटक केली असून भादंवीच्या कलम ३०७,३०२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

Leave a Comment