सिल्लोड तालुका प्रतिनिधी सागर जैवाळ
आज दि.१८ रोजी दुपारी झालेल्या पावसामुळे
सिल्लोड तालुक्यातील पळशी येथील कांताबाई गंगाधर सोनवणे राहणार पळशी (वय 36) यांचा पावसामध्ये वीज कोसळून शेतात राहत्या घरी मृत्यू झाला.त्यामुळे पूर्ण पळशी गावांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात चार मुली,एक मुलगा,सासू-सासरे,असा परिवार आहे.तसेच गावात दुसऱ्या शेतात योगेश त्रिंबक बळे यांची गाय गोठ्यात बांधलेली होती व पाऊस सुरू असतांना अचानक विजेचा वीज गायीच्या अंगावर पडली असता गाय त्यामध्ये दगावली त्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे