पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षणाचे आयोजन !30 टक्के महिला व तीन टक्के अपंगांना संधी !अर्ज करण्याचे पशुधन विस्ताराधिकारी श्री उदार यांचे आवाहन !

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

जिल्हा परिषद बुलढाणा मार्फत मागासवर्गीय विशेष घटक योजनेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गाच्या लाभार्थ्यांना पशुसंवर्धन विषयक तीन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे या प्रशिक्षणासाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रियाअकोला अकोला पंचायत समिती स्तरावर पशुधन विस्तार अधिकारी मार्फत सुरू झाली आहे सदर अर्जाचा नमुना पशुधन कार्यालयामध्ये उपलब्ध आहे .या अर्जाच्या व्यतिरिक्त इतर दुसरा कुठलाही प्रकारचा अर्ज स्वीकारले जाणार नाही सदर योजने अंतर्गत दिनांक 4 फेब्रुवारी 20 21 पासून अर्ज स्वीकारण्यात येतील अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2021 असणार आहे !अर्जदार हा मागासवर्गीय समाजाचा तसेच दारिद्र रेषेखालील असावा अर्जदाराकडे दुधाळ जनावरे शेळ्या कोंबड्या असणे आवश्यक आहे अर्जदारास १ मे 2000 हजार नंतर तिसरे अपत्य नसावे तसा ग्रामसेवकाचा दाखला अर्जासोबत जोडावा अर्जासोबत नुकतेच काढलेले छायाचित्र जोडावे योजनेमध्ये तीस टक्के महिला व 3% अपंग अर्जदाराचा समावेश असावा लाभार्थ्यास या योजनेचा लाभ 2020 – 21 च्या प्राप्त तरतुदीचे अधिन राहून देण्यात येईल । वशिली बाजूला कुठल्याही प्रकारचे थारा नसूनअर्जदाराने अर्ज करावा !अशी आव्हान सिंदखेडराजा पशुधन विस्तार अधिकारी श्री उदार यांनी केली आहे !

Leave a Comment