पिंपळगाव काळे येथे गावातील रस्त्यांचे निकृष्ट दर्जाचे काम… गावातील लोकांनी मोठ्या प्रमाणात केला विरोध….

0
838

 

पिंपळगाव काळे ग्रामपंचायतीने मागील काळात जवळपास बारा ते पंधरा लाख रुपयाचा मुरूम कोणत्याही प्रकारची निविदा न काढता गावातील काही ठिकाणी आवश्यकता नसताना सुद्धा मुरूम टाकला ज्या ठिकाणी मुरूम टाकला त्याठिकाणी अगोदरच खडीकरणाचे रस्ते काही ठिकाणी झालेले होते वास्तविक पाहता खडीकरणाचे रस्त्यावर त्याच पैशांमध्ये सिमेंटचे रस्ते झाली असते व पाच ते सहा वर्ष तो रस्ता लोकांसाठी चांगला राहिला असता ज्या ठिकाणी मुरूम टाकला त्याठिकाणी खडीकरणाचे रस्ते का करण्यात आले नाही? असा प्रश्न गावकर्‍यांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे. गावांमधील सर्व रस्त्यांमध्ये फक्त मुरूम टाकायचा होता तर त्यांची एकत्र निविदा का काढण्यात आली नाही? मागील काळात ग्रामपंचायत ने अनेक कामे रस्ते नाल्या हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे व अनियमितता यांच्या तक्रारी ग्रामपंचायत मध्ये केल्यानंतर साधी चौकशी सुद्धा केल्या गेली नाही. त्यामुळे मागील पाच वर्षांमधील सर्व कामांची आपल्या स्तरावर चौकशी अधिकारी नेमणूक करून पिंपळगाव काळे गावातील लोकांना न्याय द्यावा अशी विनंती गावकऱ्यांनी केली आहे. ज्यांनी शासनाच्या नियमांची पायमल्ली करून दिशाभूल केली त्यांच्यावर कडक कारवाई करून शासनाचे पैसे वसूल करण्यात यावे. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here