संग्रामपूर शहरातील समस्या सोडविण्याबाबत संग्रामपूर मित्र परिवाराने मुंबई येथें मंत्रालयात जाऊन दिले निवेदन

 

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन केली चर्चा

दि.29 सप्टेंबर 2020 रोजी मुबई येथे मंत्रालय येथे जाऊन संग्रामपूर शहराच्या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,समाजकल्याण मंत्री धनजयजी मुंडे साहेब तसेच नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना संग्रामपूर मित्र परिवाराच्या वतीने निवेदन देण्यात आले.

संग्रामपूर शहरात भीमनगर येथे स्थित असलेले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक असून त्याचे बांधकाम जीर्ण झाले असल्याने त्याकरिता त्याचे सौंदर्यीकरण होणे गरजेच आहे तसेच डिसेंबर 2019 पासून घरकुल लाभार्थ्यांना बांधकाम परवानगी मिळाली असूनही वेळोवेळी निधी न मिळाल्याने घर बांधकाम अपूर्ण आहेत त्यांना नऊ महिने होऊनही तिसरा चेक न मिळाल्याने त्यांची राहण्याची बिकट परिस्थिती झाली आहे त्याकरिता शासन स्तरावर मागणी करूनही त्यांना लाभ मिळत नाहीये.घरकुल लाभार्थ्यांची अत्यंत दननीय अवस्था झाली असल्याने निधी मिळणे खूप आवश्यक आहे.तसेच संपुर्ण महाराष्ट्र राज्यातील लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करण्याची देखील मागणी करण्यात आली.

गेली कित्येकदा निवेदने मोर्चे आणि आमरण उपोषणे करूनही स्थानिक नगरपंचायत कुंभकर्ण झोपेत असल्याने कोणतीही दखल घेत नाहीये त्यांचा त्रास गोरगरीब जनतेला होत आहे त्याकरिता निवेदनात दिलेल्या मागण्यांचा मा.मंत्री महोदयांनी सहानुभूती पूर्वक विचार करून मागण्या पूर्ण कराव्या अशी विनंती संग्रामपूर मित्र परिवाराच्यावतीने करण्यात आली

Leave a Comment