पुरामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण पुर्ण करुन शासनास अहवाल सादर करा -: आमदार समीरभाऊ कुणावार यांचे प्रशासनाला निर्देश

0
266

 

_आमदार समीर कुणावार यांनी स्वतः घरोघरी जाऊन केले नुकसानीच्या सर्वे_

हिंगणघाट मलक नईम

पुरामुळे हिंगणघाट शहरातील काही भागातील परिस्थिती अत्यंत भीषण झालेली आहे मा.उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी प्रशासनाला दिलेल्या आदेशानुसार तातडीने सर्वांना राज्य शासनामार्फत आर्थिक मदत देण्यात येणार आहे
आज सकाळीच आमदार समीर कुणावार यांनी महसूल व नगरपरिषद प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन शहरातील विठ्ठल मंदिर वार्ड भागातील पिली मजिद येथे नुकसानीचे सर्वेक्षण केले व संबंधित उपस्थित असलेल्या अधिका-यांना तात्काळ शासनाला अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिलेत तसेच शहरातील इतर भागात व ग्रामीण भागातील सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्यात. यावेळी तहसीलदार तथा नपा प्रशासक सर्वश्री.सतीश मसाळ, भाजयुमो प्रदेश सचिव अंकुश ठाकुर नायब तहसीलदार समशेर पठाण , जिल्हा उपाध्यक्ष सुभाष कुंटेवार,शहराध्यक्ष आशिष पर्बत, माजी नगर सेवक देवा कुबडे,,नरेश युवनाथे,अमोल खंदार, अज्जू भाई ,,कवी इंगोले,नप अभियंता मावळे,नासरे,पटवारी, मंडळ अधिकारी, नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी भारतीय जनता पक्ष व भारतीय युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here