पोटाची खळगी भरण्याकरिता आजही बहुरूपी ची सोंग घेऊन घरोघरी फिरावे लागते !शासनाने मानधन देण्याची गरज -बहुरूपी साहेबराव शिंदे यांची मागणी –

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

असे म्हणतात टिचभर पोटा साठी काय काय करावे लागते !याचेच ज्वलंत उदाहरण म्हणजे साहेबराव शिंदे होय ।उटी तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा येथील साहेबराव तळीराम शिंदे हे बहुरूपी चे सोंग घेऊन सिंदखेडराजा तालुक्यातील शिंदी या गावी आली असता त्यांच्याशी खास बातचीत केली व त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला !साहेबराव तुळशीराम शिंदे हे उटी तालुका मेहकर येथील रहिवासी आहे हे गेल्या 35 वर्षापासूनते बुलढाणा जिल्ह्यातील आपल्या घराचा गाडा आपल्या घरच्या लोकांचे पोट भरण्या करता विविध बहुरुपी सोंग घेऊन प्रत्येक घरोघरी भिक्षा मागत असतात ‘ते सांगतात की मला चार मुले आहेत ते आपापल्या कामात व्यस्त आहे ‘माझ्या पंजोबा पासून आमच्या घराला बहुरुपी सोंग घेऊन भिक्षा मागत असतो ‘मुलांना बहुरूपी ची सोंग घेऊन घरोघरी जाऊन भिक्षा मागायची लाज वाटते त्यामुळे मलाच घरोघरी जाऊन भिक्षा मागावी लागते ‘आज साहेबराव शिंदे यांचं वय 75 वर्षाचे आहे .घरी एकही गुंठा जमीन नाही ।ते सांगतात की माझे पणजोबा वडील हे महादेव, पार्वती ।पोलीस ,शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,हनुमान,राम,अशा विविध देवाचे तसेच महापुरुषाचे वेशभूषा करून ‘गावोगावी जाऊन लोकांचे कलेच्या माध्यमातून मनोरंजन करून आपल्या घराचा उदरनिर्वाह भागवत असे ‘परंतु आता अँड्रॉइड मोबाईलचा जमाना आला व सर्व कला लोप पावत चालली ‘सर्व काही मोबाईल वर दिसत असल्यामुळे ‘बहुरूपी चे सोंग कोणी बघत नाही .अशी खंत यावेळी साहेबराव शिंदे यांनी व्यक्त केली ‘तसेच शासनाने करूनच या काळामध्ये एक रुपयाची सुद्धा मदत केली नाही त्यामुळे शासनाने बहुरूपी यांना तीन हजार रुपये मानधन महिन्याचे द्यावे अशी मागणीही यावेळी साहेबराव शिंदे यांनी केली !

Leave a Comment