पोलिसांनी वाहनासह 2 लाख 62 हजार 400 रुपयाचा मुद्देमाल जप्त

 

गोंदिया, शैलेश राजनकर

दि.12ः-जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात देशी विदेशी दारुचा मोठ्या प्रमाणात व्यवसाय सुरु असून मोठ्या प्रमाणात देशी दारुची तस्करी होत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक मंगेश शिंदे, अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेच्यावतीने कारवाई 11 स्पटेंबरच्या रात्री 10 वाजेच्या सुमारास आमगांव-देवरी मार्गावरील तेलीटोला येथे करण्यात आली.यात इंडिगो कार क्रमांक एमएच 40 केआर 5078 ला थांबवून तपासणी केली असता कारमध्ये 62 हजार 400 रुपये किंमतीचे 25 पेटी पॉपुलर सन्त्रा नामक देशी दारु आढळून आली.पोलिसांनी वाहनासह 2 लाख 62 हजार 400 रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन आरोपी प्रेमलाल उर्फ राजू बलिराम उईके (28 वर्ष निवासी सावली तह. सालेकसा), सुशील तिराले(40 वर्ष निवासी साकरीटोला), तेजलाल कटरे (निवासी घोंसुला तह. सालेकसा) विरुध्द सालेकसा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक मंगेश शिंदे, अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक तेजेंद्र मेश्राम, आनंद बिजेवार, पोलीस कर्मचारी विजय रहांगडाले, लिलेंद्र बैस, राजेश बढे, विट्ठल ठाकरे, चेतन पटले, रुपराम पटले, राज बंडीवार, संजय हूड,विनोद गौतम यांनी केली.

Leave a Comment