पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा धरणात बुडून मृत्यू

 

जळगाव जामोद/पल्लवी कोकाटे

जळगाव जामोद तालुक्यातील जामोद येथून जवळच असलेल्या सोनबडी येथील धरणामध्ये आपल्या मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या लाडणापुर येथील करण मंगल शामस्कार २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी ४ वाजताच्या सुमारास घडली.श्रावणातील पहिला सोमवार असल्याने करण मंगल शामस्कार आपल्या मित्रांसोबत जटाशंकर येथे गेला होता.तिथुन परत येत असताना सोनबडी येथील धरणावर पोहण्यासाठी गेला असता त्याच्या मित्रांनी त्याला पोहण्यास मनाई केली.तरीही मृतक करण पोहण्यासाठी धरणात उतरला.तो बाहेरच आला नाही.काही नागरिकांनी पाण्यामध्ये उतरुन पाहिले असता तो सापडला नाही २ ऑगस्ट रोजी जळगाव पोलिसांनी केलेल्या प्रयत्नानंतर मृतदेह शोधून काढला.मृतकाला अल्सरचा त्रास होतो.
घटनेची फिर्याद रवींद्र अहिर यांनी पोलिसात दिली.आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

Leave a Comment