प्रदूषण नियंत्रण विभागाला गोपाल तायडे यांचे निवेदन. नगर परिषदेच्या दुर्लक्षते मुळे म्हाडा कॉलनीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात.

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव शहरात जीवन प्राधिकरण विभागा मार्फत भूगटार योजना राबविण्यात आली आहे. डॉ.अण्णा भाऊ साठे ( म्हाडा कॉलनी ) येथील भूगटारीचे काम म्हाडा विभागा कडून करण्यात आले आहे. कॉलनीतील संडास मल विसर्जन व्यवस्थापन योग्य पद्धतीने न केल्या मुळे मोठया प्रमाणात टॉयलेट चेंबर चॉकअप होत असतात.

प्रत्येक सदनिकेला स्वातंत्र्य टॉयलेट चेंबर असायला पाहिजे होते किंवा 14 सदनिका मिळून एक मोठे सेफ्टी टॅंक तरी असायला हवे होते. परंतु असे न केल्याने या 14 सदनिकेचे संडास मल भुगटारीच्या चेंबर मध्ये उतरते निमूळत्या पाईप असल्याने संडास मल पुढे जात नसल्याने तिथेच अळकून राहते त्या मुळे मल युक्त घाण पाणी चेबर च्या वरतून वाहत असून.

त्या मुळे संपूर्ण कॉलनीत दुर्घधी पसरली आहे. आणि मोठया प्रमाणात वायू प्रदूषण होता आहे.ही समास्या पाच वर्षांपासून चालू आहे.या घाण दुर्गंधी प्रदूषणा मुळे कॉलनीतील केत्येक नागरिक आजारी पळत आहेत.

नागरिकांनाच्या आरोग्यास मोठा धोका उदभवाला असून स्थानिक नगर परिषदेला वारंवार निवेदने, आंदोलने करून ही भुगटार चेंबर व घाण कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्यात येत नाही. भुगटार चेंबर चे काम जीवन प्राधिकरण मार्फत करण्यात आले होते. त्यांनी कॉलनीतील भुगटार चेंबर नगर परिषदेला शेगावला हँडवर्क (हस्तरीत ) केले आहे. त्या मुळे कॉलनीतील भुगटार चेंबर साफ करण्याची जबाबदारी नगर परिषदेची आहे. परंतु नगर परिषद जाणीव पूर्वक

कॉलनीतील भुगटार चेंबर साफ करणे तसेच घाण कचरा साफ सफाई संदर्भात कोणत्याच प्रकारचे लक्ष देत नसल्याने कॉलनीत प्रदूषण होत आहे. कॉलनीतील भुगटार चेंबरचे मोठे पाईप लाईन टाकून 14 सदनिके मिळून एक टॉयलेट चेंबर सेफ्टी टेंक देण्यात यावे कॉलनीतील ईतर घाण काचारा चे ही योग्य रित्या व्यवस्थापन कारण्यात यावे अन्यथा स्वाभिमानी या समास्या बद्दल तीव्र आंदोलन करेल.असा ईशारा गोपाल तायडे यांच्या कडून देण्यात आला आहे.

Leave a Comment