बाळापूर तालुक्यातील गुंड प्रकृतीचे दोघे भाऊ तडीपार

 

प्रतिनिधी अशोक भाकरे

अकोला जिल्ह्यात टोळीने गुन्हे करणाऱ्या उरळ पोलीस ठाण्यांतर्गत गायगाव येथील गुंड प्रकृतीच्या दोघा भावांना पोलीस अधीक्षक जी. श्रीधर सर यांनी दोन वर्षासाठी तडीपार करण्याचा आदेश दिला आहे गायगाव येथील इमदाद खान अफरोज खान वय 26 आणि अतिक खान अफरोज खान वय 20 यांच्या विरुद्ध गुन्ह्याची मालिका पाहता त्यांच्याविरुद्ध कलम 55 महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्याचा प्रस्ताव उरळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनंतराव वडतकार यांनी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर सर यांच्याकडे पाठविला होता पोलीस अधीक्षकांनी या दोन्ही गुंडांना शनिवारी दोन वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार केले आहे आतापर्यंत पोलीस अधीक्षक जी. श्रीधर सर यांनी एमपीडीअंतर्गत 69 गुंडांवर तर तडीपाराची 422 गुंडांवर कारवाई केली आहे

Leave a Comment