इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
शेगाव: बुलढाणा जिल्ह्यातील बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या वस्तू विक्रीला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने दिशा बचत गट फेडरेशनच्या वतीने बुलढाणा येथे चार व पाच नोव्हेंबर रोजी आयोजित बचत गट प्रदर्शनी मध्ये शेगाव शहर व तालुक्यातील जास्तीत जास्त बचत गट महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन दिशा बचत गट फेडरेशनच्या संस्थापक अध्यक्ष एडवोकेट जयश्रीताई शेळके यांनी शेगाव येथे बचत गटच्या महिलांसाठी आयोजित कार्यक्रमांमध्ये बोलताना केले.#jayshrishelke
आज 19 ऑक्टोंबर रोजी नगरपालिकेच्या डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी नगर हाल मध्ये शेगाव शहरातील बचत गट महिलांसाठी दिशा बचत गट फेडरेशनच्या वतीने मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.#bachatgat
त्यावेळी त्या बोलत होत्या यावेळी मंचावर काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सुनीता कलोरे प्रणिता धामंदे धामणंदे काँग्रेस महिला आघाडी शहराध्यक्ष कविता राजवैद्य बचत गट शेगाव शहर अध्यक्ष राजगुरे मॅडम सविता झाडोगार आदी मान्यवर उपस्थित होते#jayshrishelke #buldhana