बुलाडाणा येथे 26 व 27जानेवारीला होणार राज्य अधिवेशन – राज्य संघटना पदाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

 

इस्माईल शेख शेगाव प्रतिनिधी

बुलडाणा : महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे यंदाचे राज्य अधिवेशन 26 व 27 जानेवारी रोजी बुलडाणा येथे होत आहे.या अधिवेशनास राज्यातील सर्व जिल्ह्यातुन वृत्तपत्र विक्रेते, एजंट व वितरक मोठ्या संख्येने उपस्थित रहावे उपस्थित राहणार आहेत.

वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळासह वृतपत्र विक्रेत्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा होणार आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे कार्याध्यक्ष बालाजी पवार, सरचिटणीस विकास सूर्यवंशी यांनी पत्रकार बैठकीत दिली.

यावेळी राज्य संघटनेचे कोषाध्यक्ष राजेंद्र टिकार, राज्य संघटना संघटक प्रकाश उन्हाळे, कार्यकारणी सदस्य चंद्रकांत घाटोळ नांदेड, राजेंद्र हलवाई हिंगोली उपस्थित होते. राज्य पदाधिकाऱ्यांनी यावेळी तयारीचा आढावा घेतला.

श्री पवार यांनी सांगितले, वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर लढणारी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना आहे राज्यातील सर्व जिल्ह्यातील संघटना राज्य संघटनेशी संलग्न आहेत राज्यभरात सुमारे तीन लाख वृत्तपत्र विक्रेते वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करीत आहेत.

वृत्तपत्र विक्रेत्यांचे अनेक प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहेत वृत्तपत्र विक्रेत्यांची असंघटित कामगार म्हणून नोंदणी व्हावी वृत्तपत्र विक्रेत्यांना विविध सोयी सवलती मिळाव्यात यासाठी आम्ही गेली 15 वर्षे प्रयत्न करीत आहोत.

वृत्तपत्र विक्रेत्यांच्या साठी स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ गठीत करावी अशी आमची मागणी असून आम्ही त्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करीत आहोत निवेदन मोर्चा निदर्शने आधी माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत 2019 मध्ये आमच्या मागणीची व आंदोलनाची दखल घेऊन राज्य सरकारने वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ स्थापनेसाठी अभ्यास समितीची नियुक्ती केली.

या समितीमध्ये वृत्तपत्र विक्रेत्यांचे सात प्रतिनिधी मालक प्रतिनिधी दोन व राज्य शासनाचे आयएएस दर्जाचे दोन अधिकारी यांचा समावेश करून समिती गठीत करण्यात आली या समितीने वृत्तपत्र विक्री व्यवसायाची पद्धत कामाची पद्धत वृत्तपत्र विक्रेत्यांचे प्रश्न या सर्व बाबींचा बारीक विचार करून अनेकांच्या प्रतिक्रिया व माहिती घेऊन आपला अहवाल शासनास सादर केला आहे.

वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ करावे अशी शिफारसी या अभ्यास समितीने केली आहे त्याप्रमाणे वृत्तपत्र विक्रेत्यांचे स्वतंत्र कल्याणकारी मंडळ व्हावे अशी आमची मागणी आहे बुलढाणा येथे होत असणाऱ्या आमच्या या अधिवेशनामध्ये आमची ही प्रमुख मागणी आहे याशिवाय इतरही प्रश्नांवर चर्चा करून पुढील धोरण ठरवण्यात येणार आहे.

सरचिटणीस विकास सूर्यवंशी यांनी सांगितले, या अधिवेशनासाठी राज्य सरकारचे मंत्री आमदार खासदार स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी यांना निमंत्रित केले जाणार आहे आमचे प्रश्न शासन दरबारी पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे या अधिवेशनासाठी सुमारे दोन हजार वृत्तपत्र विक्रेते उपस्थित राहतील 26 व 27 जानेवारी 2023 या दोन दिवसात हे अधिवेशन होणार असून 26 जानेवारी रोजी सायंकाळी सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांचे बुलढाणा नगरीत आगमन होईल वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची विभागीय पदाधिकाऱ्यांची बैठक होईल त्यानंतर रात्री आमसभा घेण्यात येईल 27 जानेवारी रोजी सकाळी वृत्तपत्र दिंडी काढण्यात येईल त्यानंतर अकरा वाजता अधिवेशनाचा मुख्य कार्यक्रम होईल हे सर्व कार्यक्रम बुलढाणा शहर व शहरातील राधा गोविंद सेलिब्रेशन हॉल येथे होणार आहेत या अधिवेशनाचे संयोजन बुलढाणा जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.

राज्य कोषाध्यक्ष राजेंद्र टिकार यांनी अधिवेशन निमित्ताने आज पर्यंत केलेल्या तयारीची माहीती दिली बुलढाणा जिल्ह्याचे पदाधिकारी ज्ञानेश्वर इंगळे राहुल डिडोळकर माधव देशमुख संतोष गाडेकर वैभव वाघमारे श्रीकांत चौधरी रवींद्र चिंचोलकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. TV

Leave a Comment