भागीरथी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नालेगाव येथे भागीरथी माई यांचा ३९ वा स्मृतिदिन उत्साहात साजरा

 

प्रतिनिधी
ऋषी जुंधारे

विश्वात्मा शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबाद संचलित भागीरथी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नालेगाव येथे भागीरथी माई यांचा 39 वा स्मृतिदिन उत्साहात साजरा करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान संस्थेचे अध्यक्ष श्री.चंद्रकांत जी गायकवाड सर यांनी भूषविले, तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री विकास जगताप सर प्राचार्य संत नारायण गिरी महाराज महाविद्यालय विरगाव व संस्थेचे सचिव श्री.वाल्मीकरावजी सुरासे साहेब यांनी भूषविले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते भागीरथी माई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव श्री. वाल्मीकरावजी सुरासे साहेब.यांनी केले तदनंतर प्रमुख पाहुणे श्री. विकास जगताप सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर *प्रा.चंद्रकांत गायकवाड सर यांनी अध्यक्षीय भाषण केले. कार्यक्रमासाठी श्री. लाखे स्वामी, संस्थेचे संचालक श्री.दत्तात्रय सुरासे
माजी सरपंच राजू मामा सातपुते,मधुकर अण्णा शिंदे,भाऊसाहेब दादा काकडे ,मधुकर त्रिभुवन,बद्रीनाथ साबळे तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती जयश्री बोर्डे यांनी तर आभार श्रीमती. मनीषा उभेदळ यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक गंगाधर कटारे, निर्मला शिरसाठ, योगेश शिंदे, सागर राजपूत, रोहिदास त्रिभुवन, प्रवीण जाधव, भारत भोपळे गोकुळ पवार तसेच शिक्षकेतर कर्मचारी समाधान सुरासे, सुनील बोडखे, किशोर साळुंके, अमोल त्रिभुवन व विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले

 

Leave a Comment