विजेच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यकारी अभियंता शेतकर्याच्या बांधावर…

 

स्वाभिमानीचे सरनाईक,राजपुत यांनी केली होती उपाययोजना करण्याची मागणी…

चिखली–तालुक्यातील सोमठाणा येथील विद्युत ट्रान्सफार्मर वारंवार जळत असल्याने विजेच्या समस्या सोडवण्यात याव्यात,अशी मागणी स्वाभिमानी चे विनायक सरनाईक,नितिन राजपुत यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली होती.याची तातडीने दखल घेत कार्यकारी अभियंता माळोदे यांनी विजेच्या समस्या सोडवण्यासाठी दि०१जानेवारी रोजी शेतकर्याच्या बांधावर जाऊन पाहणी केली आहे.उपाययोजना करण्याबाबतच्या सुचना त्यांनी दिल्या आहेत. विजेच्या समस्या सुटणार असल्याने शेतकर्याना दिलासा मिळाला आहे.
सोमठाणा येथील जुने गावठाण १००के व्हि चा ट्रान्सफार्मर चार वेळा बदलण्यात आला परंतु तो नियमीत जळत असल्याचे समोर आल्याने शेतकर्याना शेतात पिकाला पाणी देण्याची समस्या निर्माण झाली होती.एकाच हातावर संपुर्ण लोड असल्याने आता पुन्हा नविन ट्रान्सफार्मर लावला तर तो जळणार असे दिसत असल्याने शेतकर्याच्या समस्यांवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यात यावा,अशी मागणी महावितरण कार्यालयाकडे करण्यात आली होती.या अगोदर उदभवलेल्या समस्या चिखलीचे सहाय्यक अभियंता गायकवाड यांच्या माध्यमातुन सोडवण्यात आल्या होत्या परंतु ट्रान्सफार्मर लावला तर तो पुन्हा जळणार असल्याची भिती शेतकर्याना निर्माण झाल्याने याबाबत कायमस्वरुपी उपाययोजना होण्याच्या दृष्टिने शेतकर्यासह स्वाभिमानीचे विनायक सरनाईक,नितिन राजपुत,यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री एन डी माळोदे यांच्याकडे याबाबतची मागणी केली होती.शेतकर्याच्या समस्यांची जान असल्याने कार्यकारी अभियंता माळोदे यांनी सोमठाणा गाव गाठुण सदर ट्रान्सफार्मरची पाहणी केली याबाबत नविन पोल टाकुन लोड डीव्हाइड करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या आहेत. त्याचप्रमाणे ग्रामस्थांनी गावातील समस्या मांडल्या असता मंदिरा जवळील जंगलेला मोडकळीस आलेला पोल व शेतातील वाकलेले पोल वायरींग करण्याच्या सुचना संबंधीत ठेकेदार यांना देण्यात आल्या आहेत.शेतकर्यानी कार्यकारी अभियंता मोळोदे व गायकवाड यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत केले आहे.यावेळी विनायक सरनाईक,नितिन राजपुत,भारत वाघमारे, महावितरण सहाय्यक अभियंता श्री डी जी गायकवाड,अवचितराव वाघमारे,अविनाश झगरे,छोटु झगरे,सुदर्शन वाघमारे,परमेश्वर झगरे, आंबादास झगरे, अरुण वाघमारे, ज्ञानेश्वर जाधव, भागवत झगरे, विठ्ठल झगरे, गणेश झगरे, प्रभाकर झगरे, विजय परीहार, गोटु वाघमारे यांच्यासह आदिंची उपस्थीती होती.

Leave a Comment