डी.एस. पिंगळे निलंगा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेडोळ येथे
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री संजीव कदम सर प्रमुख पाहुणे श्री डी एन सूर्यवंशी सर,बन स होते. व्यासपीठावर श्री पाटील सर सर्व शिक्षक उपस्थित होते.
श्री डी एन सूर्यवंशी सर व बन सर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर सविस्तर मार्गदर्शन केले.
आजादी का अमृतमहोत्सव या कार्यक्रमाच्या अंतर्गत आज वेशभूषा स्पर्धा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या साठी आयोजित करण्यात आली…. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काळे सर व आभार प्रदर्शन श्री. मुजावर सर यांनी केले…..